Sunday, October 24, 2021

बाप्पाचे विसर्जन करताना ‘या’ मंत्रांचा करा जप, सदैव राहिल श्रीगणेशाचा आशीर्वाद

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह देशभरात गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा होत आहे. सध्या बाप्पाच्या भक्तीत लहानग्यांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण तल्लीन आहेत. दहा दिवसांच्या मुक्कामनंतर बाप्पाला निरोप देण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला निरोप दिला जातो.

बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत मोठ्या भक्तीभावाने हा सोहळा पार पाडला जातो. उद्या म्हणजेच रविवार (19 सप्टेंबर) रोजी अनंत चतुर्दशी आहे.
बाप्पाला निरोप देताना बाप्पाची आपल्यावर वर्षभर अखंड कृपा राहो यासाठी प्रार्थना करा. बाप्पाचे विसर्जन करताना काही मंत्रांचा जप केल्याने बाप्पाची विशेष कृपा आपल्यावर कायम राहते. हे विसर्जन मंत्र जाणून घेऊ या.

गणपती बाप्पाला निरोप देण्यापूर्वी गणपती प्रतिमेच्या संकल्प मंत्रानंतर पूजा- आरती करा. गणपती बाप्पाच्या मूर्तीवर कंकू वाहा. गणपती बाप्पासाठी मंत्र बोलताना 21 दूर्वा अर्पण करा. बाप्पाला 21 लाडू अर्पण करा.

– ॐ गणाधिपाय नम:
– ॐ उमापुत्राय नम:
– ॐ विघ्ननाशनाय नम:
– ॐ विनायकाय नम:
– ॐ ईशपुत्राय नम:

– ॐ सर्वसिद्धप्रदाय नम:
– ॐ एकदन्ताय नम:
– ॐ इभवक्त्राय नम:
– ॐ मूषकवाहनाय नम:
– ॐ कुमारगुरवे नम:

यानंतर श्री गणेश मूर्ती घरातून विसर्जनासाठी घेऊन जाताना आरती करा आणि विसर्जनाच्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर त्याठिकाणी परत एकदा आरती करा. गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जन करताना या मंत्राचा जप करा
यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्.
इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च ॥

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!