Monday, October 18, 2021

वजन कमी करायचंय, तर ‘या’ धान्यांचं सेवन करा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आज प्रत्येकाची जीवनशैली बदललेली आहे. कामाचा ताण आणि धकाधकीच्या जगण्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दूर्लक्ष होतं राहतं. परिणामी, आपलं वजन वाढायला (Weight loss) सुरूवात होते. आहारात बदल करायला पाहिजे.

परंतु, आहारातील बदल म्हणजे नेमकं काय? तर आज आपण आपल्या आहारात कोणती धान्यं असायला हवीत, जेणे करून आपलं वजन कमी होईल किंवा नियंत्रणात राहील याची सविस्तर माहिती घेऊ या…वजन कमी करण्यामध्ये ब्राऊन राईस महत्वाचं धान्य मानलं जातं. कारण, त्यामध्ये भरपूर व्हिटॅमीन्स असतात.

त्यामुळे ब्राऊन राईसला सुपर फूड असंही मानलं जातं. तज्ज्ञ असं सांगतात की, ब्राऊन राईसमध्ये बी व्हिटॅमीन, मॅग्नेशियम, फाॅस्फरस, मॅग्नेशियम, एंटीऑक्सिडेंट इत्यादी महत्वाचे घटक शरीरासाठी फायदयाचे असतात. इतकंच नाही तर ब्राऊन राईसमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्यामुळे शरीरातील कोलेस्टोराॅल आणि शुगर (साखर) नियंत्रित राहते.

पचनक्रियाच्या ज्या समस्या असतात, त्या समस्याची ब्राऊन राईसमुळे नाहीशा होतात. विशेष म्हणजे ब्राऊन राईसमुळे पोट खूप काळ भरलेले राहत असल्यामुळे वारंवार भूक लागत नाही. परिणामी, वजन कमी होण्यास मदत होते.

ओट्स (Oats)
आपलं वजन कमी करण्यास ओट्स महत्वाची भूमिका बजावतो. ओट्समध्ये बीटा-ग्लुकाॅन असल्यामुळे आपली भूक तो थांबवून ठेवतो. त्यामुळे भूक लवकर लागत नाही आणि जेवलात तर कमी जेवता. परिणामी, वजन कमी होण्यास मदत होते. इतकंच नाही तर, ओट्स हा बीटा-ग्लुकाॅन पेप्टाईड होर्मोन तयार करतो,

त्यामुळे तुम्ही अन्नातून कमी कॅलरीज खाता. त्यामुळे तुमचा लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर ओट्समधील फायबरही कोलेस्टेराॅल कमी करण्यास मदत करतो, त्यामुळे हृदयासंबंधीचे आजार नियंत्रीत राहतात.

कुटू (buckwheat)
उत्तर भारतात प्रामुख्याने हे धान्य पहायला मिळतं. त्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपली भूक नियंत्रणात राहते. कारण, कुटूच्या धान्यापासून जे पदार्थ आपण खातो, त्यामुळे आपलं पोट भरलेलं राहतं. सहाजिकच आपल्याला भूक कमी लागते. त्यामुळे आपलं वजन कमी होण्यास मदत मिळते. कुटूच्या पदार्थांमधून आपल्या शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. त्यामुळे कुटूला वजन कमी करण्यास मदत करणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणून संबोधलं जातं.

मोहरीचे दाणे (Rye)
मोहरीच्या दाण्यामध्ये कॅल्शियम, मॅंगनीज, लोह, प्रथिने आणि फायबर असतात. त्याचा आपल्या आहारात उपयोग केला तर जास्त प्रमाणात ऊर्जा मिळत राहते. यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपली भूक पूर्ण करते आणि जास्त वेळ ऊर्जा टिकवून ठेवते. परिणामी, आपल्या वारंवार भूक लागत नाही आणि आपण जास्त खात नाही. अर्थात आपलं वजन घटविण्यास मोहरीचे दाणे महत्वाचे ठरतात. इतकंच नाही तर, पचनक्रिया आपली व्यवस्थित राहते.

क्विनोआ (quinoa)
क्विनोआमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे कोलेस्टेराॅल आणि वजन कमी करण्यासाठी मोठा घटक मानला जातो. जर आपण एक कप शिजवलेले क्विनोआ खाल्ले तर त्यातून 222 कॅलरीज मिळतात. त्यातून 3 ग्रॅम फायबर मिळते. एक संतुलिक आहार ठेवण्यासाठी आणि आपलं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी क्विनाआ अत्यंत महत्वाचा घटक मानला जातो.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!