Saturday, September 23, 2023

उद्धव ठाकरे मैदानात; नवा पक्ष नवे नियम, कशी असणार पुढील रणनीती

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शिवसेना पक्ष आणि पक्ष चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर ठाकरे गटाने आक्रमक भूमीका घेतली. ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी निवडणूक आयोगावर जहरी टीका केली.

अशात आता सकाळ ऑनलाऊनच्या वृत्तानुसार उद्धव ठाकरे यांनी या पुढे जाऊन नवा पक्ष सथापन करण्यासाठी हलचाली सुरू केल्या आहेत. शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये

येत आहे. या नव्या पक्षासाठी त्यांचे नाव आणि चिन्ह कोणते असणार या बाबतही चर्चा सुरू आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गडाकडून तयार करण्यात येणाऱ्या

नव्या घटनेत शिवसेना पक्षातील जून्या गोष्टी जशाच्या तशा घेतल्या जाणार आहेत. नव्या पक्षामध्येही उद्धव ठाकरे हेच त्यांच्या पक्षाचे पक्षप्रमुख असणार आहेत. तसेच पक्षाचे सर्व अधिकार हे उद्धव ठाकरे स्वत:कडेच ठेवणार

आहेत. तसेत पक्षात नव्याने प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना पक्षाच्या काही नियम व अटींचे पालन करावे लागणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी शिवसेनेतील ४० आमदार आणि १३ खासदार यांच्यासह

बंड केले. त्यांनी सुरत गाठल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. यामध्ये पुढे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. राज्यात शिवसेनेतील दोन गटांमुळे खळबळजनक

वातावरण निर्माण झाले.आम्हीचं खरी शिवसेना आहोत यावरून मोठा वाद रंगला. पुढे निवडणूक आयोगाने यावर निर्णय देत पक्ष आणि पक्ष चिन्ह शिंदे गटाला दिलं. त्यामुळे आता या सर्व घडामोडीनंतर उद्धव

ठाकरेंनी नवीन पक्षाच्या घटनेसाठी कायदेतज्ञांची एक स्वतंत्र टीम तयार केली आहे. त्यानुसार आता मशाल चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव कायम राहणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!