Saturday, October 23, 2021

मोठी बातमी:बाळ बोठेविरुद्ध आणखी एक दोषारोपपत्र

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्याविरुद्ध आणखी एक दोषारोपपत्र दाखल झाले आहे. पारनेरच्या कोठडीत असताना मोबाइलचा वापर केल्याचा गुन्हा त्याच्यासह पंधरा जणांविरुद्ध दाखल असून त्याचा तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याक बळप यांनी दिली.

दरम्यान, बोठे विरुद्ध नगर शहरात खंडणी आणि विनयभंगाचेही गुन्हे दाखल असून त्याचा तपास अद्याप सुरूच आहे. तर जरे खून प्रकरणी जामीन अर्जावर जिल्हा न्यायालय उद्या (सोमवारी) निर्णय देणार आहे.बाळ  बोठेला अटक केल्यापासून पारनेर येथील कोठडीत ठेवण्यात आले आहे. तेथे न्यायालयीन कोठडीत असताना कोठडीत मोबाइल आढळून आला होता.

उपअधीक्षक अजित पाटील, पारनेरच्या तत्कालीन तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी कारागृहाची झडती घेतली होती. तेव्हा तेथील दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपींकडे दोन मोबाइल सापडले होते. आरोपींनी हे मोबाइल पाइपमध्ये लपवून ठेवले होते. त्याच कोठडीत बोठेही होता. त्यामुळे मोबाइलचा वापर कोणी कोणी केला, याचा तपास पोलिसांनी केला

असता बोठे यानेही वकिलाशी संपर्क करण्यासाठी त्या मोबाइलचा वापर केल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्याचा तपास पूर्ण करून या सर्व आरोपींविरुद्ध पारनेरच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, रेखा जरे खून प्रकरणी यापूर्वीच दोषारोपपत्र दाखल झाले आहे. या प्रकरणात जामीन मिळण्यासाठी बोठे याच्यावतीने अर्जही करण्यात आला. त्यावरील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालय २० सप्टेंबरला निकाल देणार आहे. जरे खून प्रकरणानंतर त्यापूर्वी घडलेल्या दोन घटनांचे गुन्हेही बोठेविरुद्ध दाखल झाले. एका महिलेने विनयभंगाची फिर्याद दिली आहे.

तर दुसऱ्या महिलेने नोकरी टिकविण्यासाठी खंडणी मागितल्याची तक्रार केली आहे. यानुसार दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचा तपास अद्याप बाकी असल्याचे सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!