Monday, October 25, 2021

विराट कोहलीवर लागला ‘मोठा’ आरोप

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जेव्हापासून विराट कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे, तेव्हापासून त्याच्याविषयी अनेक खुलासे केले जात आहेत. यात आता अजून एक मोठी बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, वर्ल्ड टेस्ट

चॅम्पियनशिप फायनलनंतर (WTC) विराट कोहलीने केलेल्या वक्तव्यानंतर एका वरिष्ठ क्रिकेटपटूने बीसीसीआयकडे तक्रार केली.भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आणि यानंतर कर्णधार विराट कोहली म्हणाला, ”खेळाडूंमध्ये तो जिंकण्यासाठीचा हेतू आणि आत्मा नव्हता.

” काही खेळाडू विराटच्या वक्तव्यावर खूश नव्हते. स्पोर्ट्सकीडा आणि एनडीटीव्ही यांच्या वृत्तानुसार एका वरिष्ठ क्रिकेटपटूने याबाबत बीसीसीआय सचिव जय शाह यांच्याकडे तक्रार केली होती.

एका सूत्राने द टेलिग्राफ या वृत्तसंस्थेला सांगितले, की अनेक खेळाडू विराट कोहलीच्या अ‍ॅटिट्यूडबाबत खुश नाहीत. सूत्राने सांगितले, “विराट कोहली आपले संतुलन गमावत आहे. त्याने आपला आदर गमावला आहे आणि काही खेळाडूंना त्याचा अ‍ॅटिट्यूड आवडत नाही. तो आता प्रेरणादायी राहिलेला नाही आणि खेळाडू त्याला योग्य तो सन्मान देत नाहीत.

एवढेच नव्हे, तर विराट कोहलीने सरावादरम्यान प्रशिक्षकावर आपला रागही व्यक्त केला होता. जेव्हा प्रशिक्षक त्याला त्याच्या फलंदाजीबद्दल सांगत होते, तेव्हा तो संतापला आणि म्हणाला की मला गोंधळात टाकू नका.

रोहित शर्माला भारताच्या एकदिवसीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदावरून हटवावे, अशी सूचना कोहलीने केली होती. आगामी टी-२० वर्ल्डकपनंतर या क्रिकेट प्रकारातील कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा विराटने गुरुवारी केली. या पार्श्वभूमीवर टी-२० संघाचे कर्णधारपद रोहितकडे जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ३४ वर्षीय रोहितवरील अन्य दडपण कमी

करण्यासाठी वनडे संघाचे उपकर्णधारपद के. एल. राहुलकडे सोपवावे आणि टी-२० संघाचे ऋषभ पंतकडे देण्यात यावे अशा सूचना विराटने निवड समितीला दिल्याचे समजते. परंतु वनडे कर्णधारपद २०२३ पर्यंत सुरक्षित राहावे, याकरिता उत्तराधिकारी नसावा, याच हेतूने विराटने हा प्रस्ताव सादर केल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!