Wednesday, October 27, 2021

आता नगरच्या पालकमंत्र्यांना जेलमध्ये जावं लागेल ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अखेर मोठा नाट्यमय घडामोडीनंतर भाजप नेते किरीट सोमय्या हे कोल्हापूरला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून महालक्ष्मी एक्सप्रेसने निघाले आहेत. कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाबंदीची नोटीस बजावली आहे.

कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी सोमय्या यांना नोटीस बजावली आहे.सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यापासून रोखण्यासाठी आज सकाळपासून त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यांना बाहेर डपण्यास देखील पोलीस मज्जाव करत होते.

मात्र कोणतीही ऑर्डर नसताना पोलिसांनी बाहेर पडण्यापासून अडवल्यामुळे सोमय्या हे अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तर, भाजपच्या इतर नेत्यांनी देखील महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर

कोल्हापुरात करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे मंदिराबाहेरून दर्शन घेऊन सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि इतर ठिकाणी जाऊन सोमय्या हे बेनामी मालमत्तेची पाहणी करणार असल्याचे सोमय्या यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, पोलिसांसोबत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मोठा वाद झाल्यानंतर

अखेर महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये सोमय्या बसले असून रेल्वे मार्गस्थ झाली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना, हसन मुश्रीफ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर तुफानी टीका केली.पोलीस कोणत्याही अधिकृत ऑर्डरशिवाय केवळ पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्यावरून अटकाव करत आहेत.

कारण मुश्रीफ यांचे अनेक मोठे घोटाळे समोर येतील आणि मग पुढे काही खरं नाही. मुश्रीफांचा पहिला घोटाळा बाहेर आला तर त्यांना हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. आता दुसरा आणि मग तिसरा घोटाळा समोर आला की त्यांना जेलमध्ये जावं लागेल, असा दावा देखील सोमय्या यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!