Monday, October 25, 2021

खळबळजनक :भाजपच्या या माजी मंत्र्याची घरात गळफास घेऊन आत्महत्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी परिवहन मंत्री रजिंदरपाल सिंह भाटिया यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. भाटिया यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, यामुळे खळबळ उडाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  राजनादगांव जिल्ह्यातून खुज्जी विधानसभा मतदारसंघातून रजिंदरपाल सिंह भाटिया

तीन वेळ आमदार म्हणून निवडून आले होते. रमन सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये  रजिंदरपाल सिंह भाटिया यांना मंत्रिपद देण्यात आलं होतं. त्यानंतर मंत्रिपदावरूनही हटवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना सीएसआईडीसीचे चेअरमनपद दिले होते.2003 मध्ये रजिंदरपाल सिंह भाटिया यांना भाजपने उमेदवारी दिली होती.

त्याचवेळी त्यांना मंत्रिपद सुद्धा मिळाले होते.  2008 च्या निवडणुकीत मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नव्हती. 2013 मध्ये सुद्धा भाटिया यांना भाजपने तिकीट दिले नव्हते. त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पण त्यांनी दुसऱ्या स्थान पटकावले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रजिंदरपाल सिंह भाटिया यांनी राजनादगांव येथील छुरिया भागात आपल्या भावासोबत राहत होते. रविवारी संध्याकाळी ते घरी एकटेच होते. कुटु्ंबातील सदस्य जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनी खोली गळफास घेतला असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

रजिंदरपाल भाटिया गेल्या काही दिवसांपासून आजाराने त्रस्त होते. आपल्या प्रकृतीबद्दल ते चिंतातूर होते.भाटिया यांच्या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही. पोलिसांनी कुटुंबीयांशी चौकशी केली असून अधिक तपास करत आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!