Saturday, October 23, 2021

शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा नेते किरीट सोमय्या महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना झाले आहेत. मुंबईतील CSMT स्थानकावर पोलीस आणि त्यांच्यात बराचवेळ राडा झाला. रेल्वेस्थानकावर पोलिसांचा मोठ्याप्रमाणावर फौजफाटा होता. ज्यांनी किरीट सोमय्या यांना रोखण्याचा प्रयत्न केला.

तर, सोमय्या यांनी आक्रमक भूमिका घेत, पोलिसांना तुम्ही मला अडवू शकत नाहीत, माझ्यावरील कारवाई बेकायदेशीर आहे असं म्हणत कोल्हापूरला जाणारचं असं सांगितलं. यानंतर बराचवेळ सोमय्या हे पोलिसांचा गराड्यातच अडकले होते. मात्र ते आता महालक्ष्मी एक्स्प्रेसने प्रवास करत आहेत. दरम्यान प्रवासादरम्या पोलीस त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

यावेळी बोलतांना किरीट सोमय्या यांनी मला रोखण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार कारस्थान करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. सोमय्या म्हणाले, “हसन मुश्रिफ यांचा एक घोटाळा बाहेर काढला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात जावं लागलं. आता दुसरा घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्यांना तुरुंगात जावं लागेल. त्यामुळे मला रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.”

यावेळी सोमय्यांसोबत माध्यम प्रतिनिधी देखील मोठ्याप्रमाणावर होते. पोलिसांची दादागिरी सुरू असल्याचंही सोमय्या म्हणाले आहेत. सोमय्या यांनी पोलिसांवर विविध प्रश्नांची सरबत्ती करत, ठाकरे सरकारवर जोरदार टीका देखील केली आहे.

”मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय हे होऊ शकत नाही, मुख्यमंत्री व शरद पवार यांचं हे कारस्थान आहे. मात्र, हसन मुश्रीफचा घोटाळा मी उघड करणारचं. चार तास मला घरात कोंडून ठेवलं याचं उत्तर मुख्यमंत्री व गृहमंत्री देणार का?” असं देखील सोमय्या म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!