Wednesday, October 27, 2021

किरीट सोमय्या येणार नगर जिल्ह्यात;या साखर कारखान्याची पाहणी करणार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी सोमय्या यांना जिल्हाधिकाऱ्यांनी रितसर नोटीस दिली आहे. मात्र, काहीही झालं तरी मी कोल्हापूरला जाणाराच. माझा नियोजित दौरा पूर्ण करणारच असा निश्चय सोमय्या यांनी केला आहे.

सोमय्या यांच्या या भूमिकेमुळे त्यांना थांबवण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ते कोल्हापूरकडे रवाना झाले असले तरी त्यांना कोल्हापुरात जाण्यापूर्वीच रोखले जाण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यावर पोलीस तसेच सरकारला का आक्षेप आहे ?

याची चर्चा होऊ लागली आहे. सोमय्या या दौऱ्यात नेमकं काय करणार आहेत ? असं विचारलं जात आहे.किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील मंत्री तसेच नेत्यांवर मोठे आरोप केले आहेत. नुकतंच त्यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा दावा केलाय. याच कथित

गैरव्यवहाराची सखोल माहिती घेण्यासाठी मी कोल्हापूरच्या दौऱ्यावर जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. उद्या म्हणजेच 20 सप्टेंबर रोजी ते कोल्हापूरला जाणार आहेत. मात्र त्याआधीच त्यांना कोल्हापुरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.किरीट सोमय्या चार दिवसांसाठी दौऱ्यावर आहेत. 20 सप्टेंबरला कोल्हापुरात जाऊन सोमय्या राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या साखर कारखान्याची पाहणी करणार आहेत.

तसचे 23 सप्टेंबपरला ते अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमधील आणखी एका साखर कारखान्याला भेट देतील. तसेच या सारख कारखान्याचीही सर्व माहिती ते जाणून घेतील. त्यानंतर 27 सप्टेंबर रोजी अलीबाग येथे जाऊन रश्मी ठाकरे यांच्या अलीबागच्या गोलाई येथील बंगल्याची पाहणी करतील. तसेच शेवटीच 30 सप्टेंबर रोजी सोमय्या उपमुख्यंत्री अजित पवार

यांच्याशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्यालाही भेट देणार आहेत. या सर्व ठिकाणांवर आर्थिक गैरव्यवहार तसेच भ्रष्टाचार झाल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!