Thursday, October 5, 2023

CNG गाडी वापरणाऱ्यांसाठी अलर्ट! ही गोष्ट लक्षात ठेवा नाहीतर मोठं नुकसान

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आता उन्हाळा सुरू झाला असून, हळूहळू तापमान वाढत आहे. उन्हामुळे रस्तेदेखील तापतात, व यामुळे चालत्या गाडीला आग लागण्याच्या घटना वाढण्याची शक्यता असते.

पण जर तुम्हाला अशा घटनांना आळा घालायचा असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.गाडीला लागणाऱ्या आगीची घटना टाळण्यासाठी सरकारी सीएनजी सेंटरमध्येच वाहनाची तपासणी करा,

अन्यथा तुमच्याही गाडीला आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. चला तर, आज आम्ही तुम्हाला नोएडामधील काही सरकारी सीएनजी सेंटरची माहिती देणार आहोत, जेथे तुम्ही तुमच्या गाडीची तपासणी करू शकता.

सहाय्यक आरटीओ सियाराम वर्मा यांनी सांगितलं की, ‘गाडीला आग लागण्याच्या बहुतेक घटना सीएनजी गळतीमुळे उद्भवतात. त्यामुळेच शक्यता सीएनजी गाडी वापरताना ती कंपनीद्वारे सीएनजी किट फिट

असावी. तसंच जर तुम्ही गाडीला सीएनजी कीट बाहेरून बसवून घेणार असाल, तर मान्यताप्राप्त सीएनजी फिटमेंट सेंटरमधून ते बसवून घ्यावे.सरकारमान्य सीएनजी सेंटरमध्येच गाडीमध्ये सीएनजी किट टाका किंवा

तुमच्या गाडीतील सीएनजी किट तपासून घ्या. गाडीमध्ये कोणतेही सीएनजी किट टाकण्यापूर्वी तुम्ही संबंधित सेंटरकडे सर्टिफिकेट सुद्धा मागू शकता.जर कोणी ते दाखवण्यास नकार दिला, आणि तुमच्यासोबत असभ्य

वर्तन केल्यास तुम्ही सेक्टर -31 मध्ये असलेल्या परिवहन विभागाच्या कार्यालयात तक्रार दाखल करू शकता. त्यानंतर संबंधित सेंटरवर चौकशी करून दोषी आढळणाऱ्या सेंटरवर कारवाई करेल.’

दरम्यान, वाहनचालकाने वेळीच खबरदारी घेतली तर चालत्या गाडीला आग लागण्यासारख्या घटनांना आळा घालता येऊ शकतो.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!