Monday, October 25, 2021

पितृपक्षात करू नका या सहा चुका;अन्यथा…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भाद्रपद कृष्ण पक्षाला ‘पितृपक्ष’ म्हणतात. या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये मंगळवार २१ सप्टेंबर पासून बुधवार ६ ऑक्टोबर पर्यंत ‘पितृपक्ष’ आहे; अशी माहिती पंचागकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. मृत आप्तेष्टांचे आत्मे भाद्रपद कृष्ण पक्षामध्ये म्हणजेच पितृपक्षामध्ये

आपल्या कुटुंबीयांच्या घरी राहायला येतात, अशी समजूत आहे. त्यांच्याविषयी कृतज्ञता व आदर व्यक्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्ध विधी करतात. ज्यांचा पितृपक्ष आणि श्राद्ध विधी यावर विश्वास आहे त्यांनी पितृपक्षात कोणत्याही परिस्थितीत सहा चुका करणे टाळावे, असे सांगतात.

पितृपक्षात टाळायच्या सहा चुका

मांसाहार, मद्यपान, कोणत्याही प्रकारशी नशा करणे टाळा – पितृपक्षात मृत आप्तेष्टांचा अर्थात पितरांचा अपमान करू नका. या दिवसांत मांसाहार करू नका. मद्यपान करणे टाळा. तसेच कोणत्याही प्रकारची नशा करणे टाळा.

नखे कापू नका आणि ब्रह्मचर्य पाळा – पितृपक्षात नखे कापू नका. ब्रह्मचर्य पाळा. केसांची स्टाइल करणे टाळा. श्राद्ध विधीचा भाग म्हणून केश त्याग करावा. पण एरवी पितृपक्षात केस कापू नये.

सूर्यास्तानंतर श्राद्ध विधी करणे टाळा – सूर्योदयापासून दुपारी साडेबारा वाजेपर्यंतची वेळ श्राद्ध विधीसाठी योग्य समजली जाते. सूर्यास्तानंतर श्राद्ध विधी करणे टाळा.

लोकांना त्रास देऊ नका – पितृपक्षात लोकांना विशेष करुन मुले, महिला, आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक यांना त्रास देऊ नका. यथाशक्ती जनसेवा करा.

केळीच्या पानावर जेवा – पितृपक्षात स्वतः तसेच श्राद्ध विधीसाठी आलेले गुरुजी (ब्राह्मण) यांनी केळीच्या पानावर जेवावे. स्वयंपाक करण्यासाठी आणि जेवण वाढण्यासाठी धातूच्या वस्तूंचा/भांड्यांचा वापर करावा.

शुभ कार्य टाळा – पितृपक्षात शुभ कार्य करणे टाळा. जावळ करणे, साखरपुडा, लग्न अशी शुभकार्य तसेच वाहन खरेदी, घर खरेदी, भूखंड खरेदी अथवा कोणताही मोठा मालमत्तेशी संबंधित आर्थिक व्यवहार करणे टाळा. महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी पितृपक्षात करणे टाळा.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!