Wednesday, October 27, 2021

वेतन व बँकेत असलेल्या पैशांसंदर्भातील नियम 1 तारखेपासून बदलणार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: सप्टेंबर महिना पूर्ण होण्यासाठी फक्त 10 दिवस शिल्लक आहेत आणि त्यानंतर ऑक्टोबर सुरू होईल. ऑक्टोबरच्या सुरुवातीला तुमच्या बँक आणि पगाराशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. या नियमांच्या अंमलबजावणीनंतर तुमच्या पगारावर परिणाम होईल आणि बँकेत येणारा पगार कमी होऊ शकतो.

या व्यतिरिक्त बँकेत असलेल्या पैशासंदर्भातील नियमातही बदल होणार आहेत, ज्याची आपल्याला काळजी घेणे आवश्यक आहे.अशा स्थितीत जाणून घ्या की, बँकेशी संबंधित कोणते नियम बदलणार आहेत आणि त्याचा तुमच्या उत्पन्नावर कसा परिणाम होऊ शकतो. आपल्याला हे नियम देखील माहीत असले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही.

हातात पगार कमी येऊ शकतो?:
वेतन 2019 कायद्याअंतर्गत भरपाईचे नियम ऑक्टोबरमध्ये सर्वत्र लागू होऊ शकतात, बहुतेक खासगी कंपन्यांनी ते लागू केले आहेत. या नियमांनुसार, तुमच्या पगारामध्ये येणाऱ्या भत्त्याचा हिस्सा आता 50 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही. सोप्या शब्दात याचा अर्थ असा की, आता आपल्या पगारामध्ये

मूळ वेतनाच्या 50 टक्के असणे आवश्यक आहे, जे अनेक कंपन्या खूप कमी ठेवतात. तुमचे वेतन अनेक भागांमध्ये विभागले गेलेय, ज्यात भत्त्याचा एक भागदेखील आहे. यामुळे तुमच्या खात्यात येणारा पगार कमी होऊ शकतो, उलट तुमच्या पीएफमध्ये जास्त पैसे जमा होऊ लागतील.

ट्रेडिंग खात्यासाठी केवायसी नियम
:भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड (SEBI) ने यापूर्वी ट्रेडिंग खात्यांमध्ये गुंतवणूकदारांसाठी केवायसी अनिवार्य केले होते. यापूर्वी केवायसी अद्ययावत करण्याची शेवटची तारीख 31 जुलै होती, जी नंतर बदलून 30 सप्टेंबर करण्यात आली. आता गुंतवणूकदारांनी केवायसी करणे आवश्यक आहे. केवायसी तपशीलात पत्ता, नाव, पॅन, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, उत्पन्न श्रेणी इत्यादी अद्ययावत करणे आवश्यक आहे.

ऑटो डेबिट नाही:आरबीआयच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार ग्राहकांना प्रथम त्यांच्या स्वयंचलित व्यवहारासाठी मान्यता द्यावी लागेल. उदाहरणार्थ, जर तुमच्या खात्यातून कोणतेही ईएमआय, मोबाईल बिल पेमेंट, वीजबिल, एसआयपी पेमेंट किंवा ओटीटी पेमेंट गेले तर आधी तुम्हाला ती रक्कम मंजूर करावी लागतील. यानंतरच व्यवहार अद्ययावत केले जातील,

यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर सर्वत्र अपडेट करावा लागेल. ही प्रक्रिया OTP द्वारे पूर्ण केली जाईल. आरबीआयच्या नियमानुसार, बँकांना कोणत्याही ऑटो पेमेंटपूर्वी ग्राहकांना सूचना द्यावी लागेल आणि ग्राहकांनी मंजूर केल्यानंतरच बँक खात्यातून पैसे काढता येतील.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!