Monday, October 25, 2021

नगरच्या पालकमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट:चंद्रकांत पाटलांकडून मला भाजप प्रवेशाची ऑफर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मला चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट करुन महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. मुश्रीफांच्या या दाव्यावर आता खुद्द चंद्रकांत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मुश्रीफांना अशी कोणतीही ऑफर नव्हती, असं स्पष्ट करत मुश्रीफ आता ड्रामा करत असल्याचा हल्लाबोल चंद्रकांत पाटील यांनी केला.हसन मुश्रीफांना कोणतीही ऑफर नव्हती, असं स्पष्ट करताना एखाद्याला ऑफर दिली आणि त्यांनी ती नाकारली तर ती मेरिटवर नाकारतात, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. कुणालाही त्रास देण्याचं कल्चर आमचं नाही.

मुश्रीफांनी हा सगळा ड्रामा बंद करावा, असं चंद्रकात पाटील म्हणाले.कारवाई झाल्याने आणि घोटाळे बाहेर पडत असल्याने मुश्रीफांचा ड्रामा सुरु आहे. अमुक-तमुक करणार… माझे हितचिंतक रस्त्यावर येणार,  टीव्ही 9 ला सोबत घ्यायचं… कुठलीतरी परिस्थिती दाखवायची, मला त्यांना सांगायचंय, ड्रामा बंद करा, कायद्याची लढाई कायद्याने लढा, असं प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना दिलं आहे.

चंद्रकांत पाटील हे भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या जिल्ह्यात भाजप भुईसपाट झाला, हे भुईसपाट कुणामुळे झालं, तर मुश्रीफांमुळे, त्यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. मी त्यांना ठणकावून सांगितलं, पवार एके पवार. त्यांनी माझ्यावर इन्कम टॅक्सची धाड टाकली, आता महाविकास आघाडी प्रबळ झाली आहे.

त्यांच्यासमोर भाजपला यश मिळत नाही, त्यामुळे हे सुरु आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले.चंद्रकांत पाटलांच्या जिल्ह्यात भाजप झिरो आहे, झेडपी नाही, महापालिका नाही, काहीच नाही शिल्लाक, त्यांना हटवण्याच्या हालचाली दिल्लीत सुरु होत्या, पण अमित शाहांच्या मैत्रीमुळे त्यांना हटवलं नाही, असा टोला हसन मुश्रीफांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!