Friday, October 22, 2021

सोने दरात घसरण, चांदीचा भावही उतरला; जाणून घ्या आजचा गोल्ड रेट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदी दरात घसरण पाहायला मिळाली. मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीवर दबाब आहे. जागतिक कमकुवत संकेत हे यामागचं प्रमुख कारण आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज MCX वर सोने दरात 0.13 टक्क्यांची घसरण झाली असून दर 45,928 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

तर चांदीच्या दरात 1 टक्का घसरण झाली असून दर 59,427 रुपये प्रति किलोग्रॅम आहे.मागील सत्रात सोने दरात 0.16 टक्के आणि चांदीमध्ये 1.76 टक्के घसरण झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या मजबूतीमुळे गोल्ड रेट कमी असल्याचं बोललं जात आहे.जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगानिस्तानातील परिस्थितीचा परिणामही सोने दरावर होवून सोने दरात वाढ होऊ शकते.

वर्षाअखेरीस सोनं रेकॉर्ड स्तरावर पोहोचू शकतं असा अंदाज आहे. त्याशिवाय देशात देशात सणासुदीचा काळ सुरू होत असल्याने सोन्याची मागणी वाढेल. MCX वर ऑक्टोबरमध्ये सोने दरात वाढ होऊ शकते. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचा दर 50000 रुपयांवर पोहचू शकतो. त्यामुळे आता सोनं खरेदीसाठी चांगली वेळ आहे.

सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या सेमेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक App तयार करण्यात आलं आहे.

‘BIS Care app’ असं या App चं नाव असून ग्राहक याद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या App वर सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकतात. लायसन्स, रजिस्ट्रेशन, हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक याची तक्रार करू शकतात.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!