Monday, October 18, 2021

नगर ब्रेकींग:नगर-पुणे महामार्गावर मोठा अपघात;चार जण ठार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: नगर-पुणे महामार्गावर अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जातेगाव शिवारात आज सोमवारी दुपारी मोठा अपघात झाला आहे त्यामध्ये चार जण ठार झाल्याचे प्राथमिक माहिती आहे. पुढे जाणाऱ्या कंटेनरच्या चालकाने अचानक ब्रेक लावल्याने पाठीमागून येणाऱ्या ट्रकची कंटेनरला धडक बसली.

यावेळी दोघांच्यामध्ये असलेल्या दुचाकीवरील दोघे दोन्ही वाहनांच्यामध्ये दबले जाऊन तर पाठीमागील ट्रकमधील चालक आणि मदतनीस अंगावर लोखंडी पाइप पडल्याने ठार झाले. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य सुरू आहे. दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. जातेगाव शिवारात पुण्याहून नगरच्या दिशने येणाऱ्या एका अवजड कंटेनर चालकाने अचानक ब्रेक लावला.

त्यावेळी त्याच्या पाठीमागून एक दुचाकी आणि ट्रक येत होता. ब्रेक लावल्याने थांबलेल्या कंटेनरवर ही दोन्ही वाहने येऊन आदळली. दोन्ही वाहनांमध्ये दबले जाऊन दुचाकीवरील दोघे ठार झाले. तर ट्रकमधील लोखंडी पाईप पाठीमागून धडकलेल्या ट्रकमध्ये शिरले. त्यामुळे चालक आणि त्याचा मदतनीस असे दोघे ठार झाले.मृतांची नावे आणि तपशील अद्याप समजू शकला नाही.

अपघाताची माहिती समजल्यानंतर सुपा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. क्रेन बोलविण्यात आली असून अपघातहग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. चार मृत्यदेह पाहिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, वाहने बाजूला केल्यानंतर अधिक माहिती समोर येईल. मृतांचे नावे आणि तपशील अद्याप हाती आलेला नाही, असे पोलिसांनी सांगितले.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!