Saturday, October 23, 2021

महिन्यात गुंतवा 1,500 रुपये, मिळणार 35 लाख;पोस्टाची जबरदस्त स्कीम

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गुंतवणूकदार कमी परताव्यासह सुरक्षित गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात कारण ते कमी जोखमीचे असते जर तुम्हीही कमी जोखमीचे पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिसची नवी स्कीम तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. भारतीय पोस्टाची ग्राम सुरक्षा योजना हा असाच एक उत्तम पर्याय आहे .

ज्यामध्ये तुम्ही कमी जोखमीसह चांगला परतावा मिळवू शकता. ग्राम सुरक्षा योजनेअंतर्गत, बोनससह विमा रकमेची रक्कम 80 वर्ष पूर्ण झाल्यावर मिळेल किंवा त्यांचा मृत्यू झाल्यास या व्यक्तीच्या कायदेशीर वारसाला मिळते.अटी आणि शर्थी, नियम19 ते 55 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक ही विमा योजना घेऊ शकतो. या योजनेअंतर्गत किमान विमा

 रक्कम 10,000 ते 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवली जाऊ शकते. या योजनेचे प्रीमियम अर्थात हप्ता पेमेंट मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक अशा पद्धतीने केले जाऊ शकते. प्रीमियम भरण्यासाठी ग्राहकाला 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी दिला जातो. या अवधीत पैसे न भरल्यास, ग्राहकाला पॉलिसी पुन्हा सुरु करण्यासाठी प्रलंबित प्रीमियम भरावा लागेल.

कर्जही मिळणारया विमा योजनेवर तुम्ही कर्जही घेऊ शकता, पॉलिसी खरेदीच्या चार वर्षानंतर तुम्हाला या पॉलिसीवर कर्ज मिळू शकते.पॉलिसी सरेंडर करू शकतोग्राहक 3 वर्षांनंतर पॉलिसी सरेंडर करु शकतो. अशा परिस्थितीत आपल्याला त्याचा कोणताही लाभ मिळणार नाही. पॉलिसीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे इंडिया पोस्टाने दिलेला बोनस आहे.

परिपक्वता लाभ (Maturity Benefit)जर कोणी 19 वर्ष वयाच्या आत 10 लाखांची ग्राम सुरक्षा पॉलिसी खरेदी केली तर मासिक प्रीमियम 55 वर्षांसाठी 1,515 रुपये, 58 वर्षांसाठी 1,463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1,411 रुपये असेल. पॉलिसी खरेदीदाराला 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपयांचा परिपक्वता लाभ (Maturity Banefit) मिळेल.

60 वर्षांसाठी परिपक्वता लाभ (Maturity Banefit) 34.60 लाख रुपये असेल.संपूर्ण माहिती कुठे मिळेल?नाव किंवा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर यासारख्या तपशीलांमध्ये कोणतेही अपडेट असल्यास, त्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकता. इतर प्रश्नांसाठी, ग्राहक दिलेल्या टोल-फ्री हेल्पलाईन 1800 180 5232/155232

वर किंवा अधिकृत वेबसाइट www.postallifeinsurance.gov.in वर संपर्क साधू शकतात.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!