Sunday, October 24, 2021

नगर ब्रेकींग:पवार परिवाराशी संबंधित नगर जिल्ह्यातील त्या कारखाना घोटाळाप्रकरणी लवकरच कारवाई ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यातील पारनेर साखर कारखाना बचाव समितीच्या सोबत मी पारनेर साखर कारखान्यास भेट देणार आहे. ३२ कोटी रुपयांमध्ये कशा पद्धतीने कारखाना पवार परिवाराच्या प्रभावाखाली दिला गेला. पवार परिवाराचे घनिष्ठ उद्योगपती मित्र यांनी त्यामध्ये २३ कोटी रुपये कसे टाकले? या सगळ्यांचे पुरावे

 माझ्या हातात आलेले आहेत. ईडीसोबत माझी चर्चा सुरू आहे. परवा मी पारनेर साखर कारखान्याची पाहणी केल्यानंतर ईडी सोबत चर्चा करणार आहे. नगर जिल्ह्यातील पारनेर साखर कारखान्याची आयकर विभाग, सहकार मंत्रालय आणि ईडी कडून चौकशी सुरू आहे. जरंडेश्वर नंतर पवार परिवाराशी संबंधित

पारनेर साखर कारखान्याचा घोटाळ्याबाबत येत्या काही आठवड्यात कारवाई सुरू होणार.” अशी माहिती भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी काल पुण्यात पत्रकारपरिषदेत बोलताना दिली.यावेळी सोमय्या म्हणाले, “हसन मुश्रीफ यांच्या संबंधात मी एवढच सांगणार, की ठाकरे सकारच्या राज्यात मंत्री झाल्यानंतर

त्यांनी कशापद्धतीने गडहिंग्लज साखर कारखाना काबीज केला. कोणत्याही प्रकारची लिलाव प्रक्रिया नाही. थेट मंत्रालयातून हसन मुश्रिफांच्या बेनामी कंपनीला कारखाना दिला गेला आणि त्यात पैशांची हेराफेरी हे उद्धव ठाकरेंच्या राज्यात झालेलं आहे. मी पुढच्या आठवड्यात हसन मुश्रीफ यांनी स्वतःच्या

मंत्रालयाचं कॉन्ट्रॅक्ट स्वतःच्या बेनामी कंपनीला कशा पद्धतीने दिलं, याचे देखील कागदपत्र जनतेसमोर मांडणार आहे.”याचबरोबर, “पवार परिवाराचे घनिष्ठ मित्र, उद्योजक त्यांनी यामध्ये २३ कोटी रुपये हा साखर कारखाना घेण्यासाठी दिले होते. ३२ कोटीत लिलाव झाला. अतुल चोरडियांनी हे पैसे दिले.

यात कोणकोण आहेत? कारण, जरंडेश्वरमध्ये असंच झालं. ६५ कोटीत कारखाना दिला गेला आणि ते ६५ कोटी कोणी भरले?, ओंकार बिल्डर्स. त्या बिल्डर्सचा आणि साखर कारखान्याचा संबंध काय? पवार परिवार काय म्हणतं आमच्याशी संबंध म्हणजे जगाशी संबंध. तर ओंकार बिल्डर आज सहा महिन्यांपासून तुरुंगात आहे. त्याच्याकडून अजित पवारांच्या पत्नीच्या

नावाने लोन लिस्ट देण्यात आलं. अशाच प्रकारचं कटकारस्थान पारनेर कारखान्यात दिसत आहे.” असं किरीट सोमय्या यांनी बोलून दाखवलं.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!