Friday, October 22, 2021

SBI च्या कोट्यावधी ग्राहकांसाठी महत्वाची बातमी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशातील सर्वात मोठी सरकारी स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) आपल्या 44 कोटी ग्राहकांना सायबर भामट्यांपासून वेळोवेळी सतर्क करत आहे. नुकतेच एसबीआयने आपल्या ग्राहकांना फ्रॉड नंबर बाबतही अलर्ट दिला आहे. 

एसबीआयच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून ग्राहकांसाठी अलर्ट देण्यात आला आहे. खोट्या कस्टमर केअर नंबरपासून सावध रहा. एसबीआयच्या अडचणी किंवा सेवांच्या माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवरील क्रमांकावरच संपर्क करा. याशिवाय, बँकेच्या खात्याची माहिती कोणासोबतही शेअर करू नका, असे एसबीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

याचबरोबर, बँकेने ट्विटसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती बनावट कस्टमर केअर नंबरवर फोनवर कॉल करतो, ज्यात फसवणूक करणाऱ्याकडून सर्व माहिती घेऊन अकाउंटचे उल्लंघन केले जाते. व्हिडीओच्या शेवटी असे म्हटले आहे की, कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास त्याची त्वरित तक्रार करा. तुम्ही report.phising@sbi.co.in किंवा सायबर क्राइम हेल्पलाइन नंबर 155260 वर कॉल करू शकता.

अलीकडेच, एसबीआयने ग्राहकांना मोफत भेटवस्तूंच्या नावाखाली फसवणुकीबद्दल इशारा दिला होता. बँकेने ट्विटरच्या माध्यमातून म्हटले होते की फसवणूक करणारे ग्राहकांना मोफत भेटवस्तूच्या नावावर लिंक पाठवून त्यांचे वैयक्तिक तपशील चोरत आहेत.

 सध्या देशात डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा परिस्थिती बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्ये सुद्धा सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे अशातच एक चूक देखील आयुष्याची कमाई वाया घालवू शकते.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...

जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना नगरचे पालकमंत्री जनतेला लुटत होते

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका...

विखे-पाटील यांना नैराश्याने ग्रासले

माय महाराष्ट्र न्यूज : भाजपचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती देशाच्या, जनतेच्या हिताची नाही. त्यामुळे राज्यात किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार येत्या महापालिका...

बापरे:कोरोनाचा नव्या रुपातील विषाणू आढळून आला

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे शंभर कोटीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त डॉ. मांडे यांच्याशी सीएसआयआर मुख्यालयात सकाळने संवाद साधला. कोरोनाचा नव्या रुपातील...

नगरमध्ये दोन भावांकडून महिलेची छेडछाड लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत…

माय महाराष्ट्र न्यूज:दोन भावांनी एका विधवा महिलेची छेडछाड करीत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून विकास शामसुंदर गायकवाड...

फडणवीसांची जिरवायची हे गडकरींसोबत आधीच ठरलं होत: काँग्रेस नेत्यांचा खळबळजनक दावा

माय महाराष्ट्र न्यूज:नांदेड इथल्या बिलोली येथे आयोजित प्रचारसभेत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाला बहुमत जरी...
error: Content is protected !!