Sunday, October 24, 2021

बेलवंडी दरोड्यातील आरोपी खडकाफाटा टोलनाक्यावर जेरबंद

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

बेलवंडी (ता.श्रीगोंदा) येथील दरोड्यातील आरोपीला स्थानीक गुन्हे शाखेकेच्या पथकाने नेवासा तालुक्यातील खडकाफाटा टोलनाक्यावर जेरबंद केले आहे.

या बद्दलची अधिक हकिगत अशी कि, फिर्यादी राजाराम चंदर ढवळे (वय ४४ वर्षे) धंदा-शेती, रा. राजापूर शिवार, ता. श्रीगोंदा यांची राजापूर शिवारातील घोडनदी पात्रालगत गट नं. १४० मध्ये शेत जमिन असून सदर जमिनी मधील चिंचणी धरणाचे पाणि कमी झाल्यानंतर फिर्यादी हे सदर जमिनीमध्ये जनावराकरिता चारा पिकवून काही क्षेत्रामधील मातीची विक्री करतात. त्या दरम्याण दि. २८/०५/२०२१ रोजी व त्यापूर्वी आरोपी नामे संतोष राधू शिंदे, रा. राजापूर, ता. श्रीगोंदा याने व त्याचे इतर साथीदारांनी फिर्यादी यांना वेळोवेळी दमदाटी करुन व रिव्हॉल्वरचा धाक दाखून फिर्यादी यांचे शेत जमिनीमधून जेसीबी व पोकलँडचे सहायाने अंदाजे १२ लाख रुपये किं.ची माती बळजबरीने घेवून गेले होते. सदर बाबत फिर्यादी यांनी बेलवंडी पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. २२७/२०२१ भादवि कलम ३९५ सह आर्म अॅक्ट कलम ३/२५, ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

गुन्हे दाखल झाल्यानंतर गुन्हयातील मुख्य आरोपी संतोष राधू शिंदे हा फरार झाला होता. नमुद फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमून आरोपीचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार हे फरार आरोपीचा शोध घेत असताना पोनि अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली कि, आरोपी संतोष शिंदे हा एका पांढऱ्या रंगाचे महिन्द्रा एक्सयुव्ही गाडी नं. एमएच १६ बीएम ७००१ या गाडीमधून औरंगाबाद- अहमदनगर रोडने अहमदनगर शहराचे दिशेने येत आहे. आता लागलीच खडका फाटा टोलनाका येथे सापळा लावल्यास मिळून येतील अशी माहिती मिळाल्याने पथकातील सपोनि गणेश इंगळे, पोहेकॉ भाऊसाहेब काळे, दत्तात्रय गव्हाणे, विजयकुमार बेठेकर, फकीर शेख, पोना सुरेश माळी, विशाल दळवी, संतोष लोढे, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, रवि सोनटक्के, पोकॉ जालिंदर माने, रणजित जाधव, शिवाजी ढाकणे, चालक पोहेकॉ संभाजी कोतकर अशांनी मिळून खडका फाटा टोलनाका येथे जावून सापळा लावून थांबले.
त्यानंतर काही वेळातच बातमी मधील नमुद क्रमांकाची सफेद रंगाची एक्सयुव्ही कार ही औरंगाबाद बाजूकडून अहमदनगर ये दिशेने येत असल्याची दिसल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर कारला घेराव घालून सदरची कार व कारमधील इसमास ताब्यात घेवून त्यस पोलीस पथकाची ओळख देवून त्यास त्याचे नांव, पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव, पत्ता संतोष राधू शिंदे, (वय ४२ वर्षे) रा. राजापूर, ता. श्रीगोंदा असे असल्याचे सांगीतले. सदर आरोपी इसम व त्याचे ताब्यातील १० लाख रु. किं.चे महिन्द्रा एक्सयुव्ही गाडी नं. एमएच १६ बीएम-७००१ जप्त करुन आरोपीस मुद्देमालासह बेलवंडी पो.स्टे. ला हजर करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही बेलवंडी पो.स्टे. करीत आहेत.
आरोपी संतोष राधू शिंदे याचे विरुध्द यापुर्वी फसवणूक करणे, मारामारी, बेकायदा हत्यार बाळगणे अशा स्वरुपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

 

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!