Monday, October 25, 2021

कृषि पदवीधर संघटनेतील फेरबदल वर्ष अखेर निश्चित. समन्वयक पद अस्तित्वात

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्य कृषि पदवीधर संघटनेत गेल्या १० वर्षा पासुन राज्यातील कृषि व संलग्न पदवीधर,शेतकरी सोबत घेऊन काम करणारी संघटना आहे.गेल्या २ वर्षां पासून कृषि पदवीधर संघटनेमध्ये अनेक नाविन तरुण,सामाजिक कार्यकर्ते यांनी संघटनेचे सदस्यत्व स्वीकारून आपापल्या भागात या

संघटनेच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यास सुरुवात केली गेल्या २ वर्षा मध्ये अनेक लोकांनी या संघटनेला स्थानिक पातळीवर व बदलत्या काळात ऑनलाईन उदंड प्रतिसाद दिला आहे व सदस्य संख्या वाढली आहे. नव्या सदस्यांनी जिल्ह्यातील ,तालुक्यातील शासकीय, निमशासकीय उपक्रम राबवले आहे परंतु याच बरोबर काही सदस्य यांनी संस्थेचे नियमाचे व व्यवस्थेच्या

शिस्तीचे पालन केलेले नाही असे बरेचदा निदर्शनास आले आहे या सिध्द व्यवस्थेला गालबोट लावण्याचा प्रयत्न काही अविचारी स्वयंसेवक यांनी केला आहे. याच बरोबर जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष अशी पदे मिळाली कि त्या सदस्य यांचा ओढा सामाजिक कार्य करण्या ऐवजी राजकीय विचार घेऊन ते वाटचाल करीत आहेत.

पद हे कार्य करण्यासाठी आहे आणि सेवा करण्यासाठी आहे यातून एक उत्कृष्ट कामगिरी करून एका मोठ्या विचाराला आपण जोडले जाण्याची परिपक्वता अजून या नवीन सदस्यांना नाही असे मत संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती मंगल कडूस पाटील यांनी व्यक्त केले आहे. तरी सामाजिक संस्था असल्याने संस्थेने सर्वांना समजून घेऊन हे कार्य सुरू आहे. संस्थेच्या सामाजिक

 उद्दिष्ट बाजूला करून गट तट करण्याचा प्रयत्न संचालक मंडळाला दिसून आला यावर संचालक मंडळाने अध्यक्ष व इतर नावे असलेली पदे बरखास्त करून फक्त ३१ मार्च २०२० व २०२१ नंतर अधिकृत नोंदणी केलेल्या सदस्यांनाच पद अथवा जबाबदारीचा नवा नियम संचालक मंडळाने आणला आहे अशी माहिती कडूस पाटील यांनी दिली आहे. सदर निर्णयाची अधिकृत

 सूचना संघटनेच्या अधिकृत फेसबुक व व्हाट्सएप गृप वर आज दिनांक २० सप्टेंबर २०२१ रोजी देण्यात आली असून या पुढे सदस्य नोंदणी न केलेल्या सदस्य यांनी संघटनेच्या नावाच्या अथवा लेटरहेड अथवा अंतर्गत व्यवस्थेचा गैरवापर करणाऱ्या सदस्या वर कारवाईचे संकेत विद्यार्थी अध्यक्ष कृषिश्री मानिष भदाणे पाटील व अध्यक्ष मंगल कडूस पाटील यांनी दिले आहे.

या नंतर जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष पद अस्तित्वात न राहता संस्थेच्या महत्त्वाच्या व्यक्तींना समन्वयक म्हणून संबोधण्यात येईल. याच बरोबर वर्ष अखेर राज्याची संपूर्ण जम्बो विद्यार्थी व युवा कार्यकारणी जाहीर करणार असल्याचे मनीष भदाणे पाटील यांनी सांगितले आहे. सामाजिक कार्यात स्वतः चा वाटा योगदान देणारे सदस्य च या पुढे संस्थेच्या सदस्य अथवा

महत्वाचे पदावर राहतील असे देखील ते म्हणाले आहेत. संस्थेच्या अंतर्गत शिस्त आणणे कार्याला प्राधान्य असल्याचे इतर उद्दिष्ट ठेऊन संस्थेच्या सदस्यत्व नियम भंग करणार्यांना या पुढे संघटनेत स्थान नाही असे संचालक प्रतीक बोंगाडे यांनी म्हंटले आहे या पुढे सक्रिय व नोंदणीकृत आणि स्वयंसेवी सेवाभावी विद्यार्थी युवक युवती महिला शेतकरी सर्व विभागाचे पुनर्निर्माण होणार

असल्याचे श्री प्रतीक बोंगाडे यांनी म्हटले आहे. गेल्या दोन वर्षांत कार्याला मदत केलेल्या नियम शिस्तबद्ध कार्य केलेल्या स्वयंसेवक यांना जम्बो कार्यकारणी मधे स्थान असेल असे मनीष भदाणे पाटील यांनी सांगितले आहे. विदर्भ व मराठवाडा विभागातील जुनी पदे बरखास्त करण्यात आली असून

 येत्या काही दिवसांत मुलाखती द्वारे कार्यकारिणी तयार होणार आहे. मुलाखती ची जबाबदारी लवकरच स्थानिक पातळीवर दिली जाणार आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!