Wednesday, October 27, 2021

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीत 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी पुणे व जेजुरी इथे 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) या पदांसाठी ही भरती आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती:अप्रेन्टिस – इलेक्ट्रीशियन – एकूण जागा 22 तर शैक्षणिक पात्रता आणि अनुभव:या पदभरतीसाठी उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्णअसणं आवश्यक आहे. तसंच राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली या मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री (इलेक्ट्रीशियन) या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा:या भरतीसाठी उमेदवारांचं वय वयवर्षे 18 ते 30 दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट देण्यात आली आहे.उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना:ऑनलाईन अर्ज सादर करताना दहावी उत्तीर्ण गुणपत्रिका आणि ITI उत्तीर्ण गुणपत्रिका यामध्ये नमुद केलेले नाव आणि आधारकार्डवर नमुद केलेल्या

नावाशी सुसंगत आहे का याची पडताळणी करुन माहिती भरावी,दहावीचं गुणपत्रकआणि ITI उत्तीर्ण गुणपत्रकाची ओरिजिनल प्रत ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड करणं आवश्यक आहे.शिकाऊ उमेदवारांची सही, पालकांची सही, प्रवर्ग, जन्मतारीख, एस,एस.सी.मार्क्स आयटीआय मार्क ही माहिती अचुक भरण्यात यावी, सदर माहिती उपलब्ध न झाल्यास उमेदवाराचा भरती प्रकियेसाठी विचार केला जाणार नाही.

ऑनलाईन अर्ज सादर करताना उमेदवारांनी त्यांचा सध्या चालू असलेला मोबाईल नंबर देणं आवश्यक आहे. जर भरतीदरम्यान उमेदवारांशी संपर्क होऊ शकला नाही तर जबाबदारी कंपनीची राहणार नाही.आरक्षणाचा लाभ घेणा-या उमेदवारांना ऑनलाईन अर्जासोबत जाती प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज प्राप्त उमेदवारांना शैक्षणिक कागदपत्रे पडताळणी करीता ई-मेलद्वारे दिनांक, वेळ आणि स्थळ कळवण्यात येईल.उमेदवारांनी उपस्थित राहावं.

ही कागदपत्रं आवश्यक पासपोर्ट साईज फोटो-२.,ऑनलाईन नोंदणीचे दस्तऐवज व शैक्षणिक कागदपत्रे (मुळ प्रती),शाळा सोडल्याचा दाखला,बोर्ड प्रमाणपत्रI,ITIगुणपत्रक (चारही सत्र / वार्षिक),मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र.आधारकार्ड , बँक पासबुक (मुळ प्रत)अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2021.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!