Monday, October 25, 2021

नगर जिल्हा ब्रेकींग: एसटी बसमध्ये चालकाने गळफास घेत आत्महत्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील एक धक्कादायक बातमी समोर आले आहे.एका एसटी बसमध्ये चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर बसस्थानकात उघडकीस आली आहे. या घटनेने एसटी विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

सुभाष तेलोरे (रा. कोल्हार कोलूबाईचे, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे या चालकाचे नाव आहे.याबाबत माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये सुभाष तेलोरे यांनी गळफास घेतला. हा प्रकार सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास येथील काही कर्मचाऱ्यांच्या

निदर्शनास आला. एम. एच. १४, बी. टी. ४८८७ क्रमांकाच्या पाथर्डी-नशिक या बसमध्ये तेलोरे यांचा मृतदेह आढळून आला असून याच बसवर ते चालक म्हणून कर्तव्यावर होते. दरम्यान काल रात्री त्यांनी डेपोमध्ये बस लावल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा अंदाज आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे‌.

आज पहाटे पाच वाजता त्यांच्या इतर चार सहकाऱ्यांसह प्रात: विधी व इतर आटोपून फ्रेश झाले होते. त्यानंतर त्यांनी इतरांना सांगितले की मी पुढे जातो तुम्ही पाठीमागून या. त्यानंतर पंधरा मिनिटांनी एसटी बस वाहक येथे आला असता त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत चालकाचा मृतदेह आढळून आला.

त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठी मध्ये त्यांना सुमारे साडेसहा लाख रुपये कर्ज असल्याने, कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. उत्तरीय तपासणीसाठी त्यांचा मृतदेह संगमनेरच्या कॉटेज रुग्णालयात पाठवण्यात आला आहे

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!