Monday, October 18, 2021

नगर जिल्ह्यात कोरोना नियम कडक करण्याच्या सूचना

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. राधाकृष्ण गमे यांनी सोमवारी आढावा बैठक घेतली.अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील,

महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक सुनील पोखरणा यावेळी उपस्थित होते.करोना रुग्णांची संख्या कमी जास्त होत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात नियम कडक करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. राधाकृष्ण गमे यांनी सोमवारी आढावा बैठक घेतली.

त्यामध्ये या सूचना देण्यात आल्या असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.मास्कचा वापर करण्याचा नियम अधिक कडक करण्यात आला आहे. तसंच पोलिसांना रस्त्यावर उतरून कारवाईचा आदेश देण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी सायंकाळपासूनच कारवाई सुरू केली आहे.

बाजारपेठेसोबतच दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या विना मास्क नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे.जिल्ह्यातील वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आरटीपीसीआर चाचण्या वाढवण्याचे निर्देश डॉ. गमे यांनी आज करोना आढावा बैठकीत दिले. संभाव्य तिसरी लाट आली तर तशी तयारी ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. हॉस्पिटलमधील बेड्स, ऑक्सिजन व इतर सुविधांचा आढावा घेण्यात आला.

संसर्ग नियंत्रणावर जास्त भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यासाठी एका पॉझिटिव्ह रुग्णामागे त्याच्या संपर्कातील तीस व्यक्तींची तपासणी करण्याचा आदेश देण्यात आला. दहा टक्क्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या परिसरात कडक लॉकडाऊन करणे, आठवडी बाजार बंद ठेवणे, मास्क न घालणाऱ्या ग्राहकांना वस्तू देणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करणे,

मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे, करोना संसर्ग वाढीला कारणीभूत ठरणाऱ्या आणि प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या आस्थापना बंद करणे, गृहविलगीकरण बंद करणे, बंद कोविड सेंटर पुन्हा सुरु करणे, लसीकरण वाढवणे अशा उपाययोजना अंमलात आणण्याची सूचनाही विभागीय आयुक्तांनी केली.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!