Saturday, October 23, 2021

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या दर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आज कोणताही बदल झालेला नाही. आज सलग 16व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आयोसीएलने आज मंगळवारी नवीन दर जारी केले आहेत. गेल्या 5 सप्टेंबर रोजी तेल कंपन्यांनी इंधन दरात 15 पैशांची सवलत दिली होती. यानंतर सलग दर स्थिर आहेत.

IOCL च्या मते, राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 101.19 रुपये आणि डिझेलचे दर 88.62 रुपये प्रति लीटर आहेत. तर आज मुंबईत पेट्रोल 107.26 रुपये प्रति लीटर आहे तर डिझेल 96.19 रुपये प्रति लीटर आहे. दरम्यान तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन लेटेस्ट इंधनाचे दर तपासू शकता.

पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. शुक्रवारी 45 व्या GST काउन्सिल बैठकीनंतर वित्त मंत्री निर्मला सीमारामन यांनी यामध्ये घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी काउन्सिलच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं की, जीएसटी काउन्सिलने सांगितलं की, पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची ही योग्य वेळ नाही.

SMS च्या माध्यमातून तपासा इंधनाचे दर:पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता.

तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!