Wednesday, October 27, 2021

राज्याला डेल्टापासून धोका कायम

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात चाचणी करण्यात आलेल्या १ टक्के नमुन्यांमध्ये AY.4 व्हेरिएंट आढळला होता. जुलै महिन्यात या व्हेरिएंटचे वाढीचे प्रमाण २ टक्के तर ऑगस्टमध्ये ४४ टक्के आहे. ऑगस्ट महिन्यातील नमुन्यांचे बारकाईने निरीक्षण केले, तर असे आढळून येईल की, १११ नमुन्यामध्ये डेल्टा (B.1617.2) आढळला. एकूण ३०८ नमुन्यांचे विश्लेषण करण्यात आले.

हे प्रमाण ३६ टक्के आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.पंAY.4 १३७ नमुन्यांमध्ये आढळला. हे प्रमाण ४४ टक्के आहे. संपूर्ण देशभराचा विचार केला, तर जून महिन्यात सर्व नमुन्यांच्या चाचणीमध्ये AY.4 चे प्रमाण ५ टक्के होते. जुलैमध्ये ते वाढून ८ टक्के झाले. ऑगस्ट महिन्यात हेच प्रमाण ४५ टक्के होते. डेल्टा व्हेरिएंटमुळे कोविडच्या लक्षणांमध्ये किती बदल झालाय,

त्यामुळे एखादा रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण किती आहे, त्याचा अभ्यास महापालिकेकडून केला जातोय. AY.4 चा जागतिक स्तरावर अभ्यास सुरु आहे.कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटपैकी डेल्टा व्हेरिएंटपासून धोका कायम आहे. महाराष्ट्रात आणि भारतात डेल्टा व्हेरिएंटबाधितांची संख्या जास्त आहे. आता याच डेल्टाच्या घराण्यातील AY.4 या नव्या उप व्हेरिएंटने बाधित होणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. AY.4 मुळे चिंताजनक स्थिती आहे, असं आताच म्हणणं खूपचं घाईचं ठरेल, असं शास्त्रज्ञांच मत आहे.

सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ सांगतात, कोव्हिड-19 हा RNA व्हायरस आहे. त्यामुळे व्हारस म्युटेट होण्याची शक्यता खूप जास्त असते. “डेल्टा व्हेरियंटमध्ये आणखी म्युटेशन झाल्यामुळे, नवीन डेल्टा प्लस व्हेरियंट तयार झाला,” असं डॉ. लीना गजभर म्हणतात.

‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटमध्ये डेल्टा व्हेरियंटमध्ये असलेले सर्व म्युटेशन आहेत. त्यासोबत स्पाईक प्रोटीममध्ये झालेलं K417N म्युटेशनदेखील आढळून आलंय, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

कोरोना व्हेरियंट्स

भारतात सर्वात पहिल्यांदा आढळून आलेल्या ‘डेल्टा व्हेरियंट’चं शास्त्रीय नाव B.1.617.2 आहे. त्यानंतर डेल्टा व्हेरियंटमध्ये हळूहळू बदल होत गेले. ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंट’चं शास्त्रीय नाव B.1.617.2.1 असं आहे.

‘डेल्टा प्लस’ व्हेरियंट’ कसा तयार झाला याची माहिती देताना, नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल सांगतात, “कोरोना संसर्गाची दुसरी लाट अधिक झपाट्याने पसरण्यासाठी ‘डेल्टा व्हेरियंट’ कारणीभूत होता. यात आणखी एक म्युटेशन (बदल) झाल्याचं आढळून आलं. याला ‘डेल्टा प्लस’ किंवा ‘AY.1’ असं नाव देण्यात आलं.”

सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ पुढे सांगतात, “mRNA व्हायरसची संख्या वाढताना त्याच्या मूळ रूपात बदल होतो. ज्यामुळे विषाणूला नवीन रूप प्राप्त होतं. काहीवेळा म्युटेशन व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनमध्ये होतं.”

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!