Monday, October 18, 2021

महाराष्ट्र पुन्हा हादरला: १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; पीडितेची आत्महत्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्रात एक संतापजनक घटना समोर आली.त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा हादरला आहे. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यामध्ये महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन तरुणीवर ३ जणांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर पीडित मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.

सोनपेठ तालुक्यातील १६ वर्षीय मुलीला त्याच परिसरातील तीन मुले मागील दोन वर्षांपासून त्रास देत होती. त्यातच १२ सप्टेंबर रोजी या नराधम तरुणांनी पीडित मुलीला तालुक्यातील डिघोळ तांडा परिसरात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर नैराश्यात गेलेल्या अल्पवयीन मुलीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

तिला उपचारासाठी अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तेथील डॉक्टरांनी तिला लातूरला हलवण्याचा सल्ला दिला. मात्र पीडित मुलीचा लातूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.नातेवाईकांच्या तक्रारीनंतर या प्रकरणी १९ सप्टेंबर रोजी पोलिसांनी भादंवी कलम ३७६(ड),३५४(ड)३४ सह

कलम ३,६,८,१७ सह पोस्कोअंतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. तसंच पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यातही घेतलं आहे. या बलात्कार प्रकरणातील अन्य एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.या घटनेचा अधिक तपास सोनपेठचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाने, पोलीस उपनिरीक्षक

 विष्णु गिरी, पोलीस उपनिरीक्षक मंचक फड यांच्यासह सोनपेठ पोलीस करत आहेत.दरम्यान, सामूहिक बलात्कार आणि नंतर झालेल्या मुलीच्या आत्महत्येनं परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!