Friday, October 22, 2021

बुद्धिमान व्यक्तीचा पाया बालवयातच घडविला जातो-डॉ.अशोक बेलखोडे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

अहमदनगर

सुदृढ, निरोगी व बुद्धिमान व्यक्तीचा पाया बालवयातच घडविला जातो. सुदृढ बाळासाठी आरोग्य, त्यासाठी लसीकरण, लसीकरणासाठी आरोग्य केंद्रे, आरोग्य केंद्रे नीट सुरू राहण्यासाठी वीज, बांधकाम, रस्ते, दूरसंचार, पूर नियंत्रण विभाग अशा सर्व विभागांवर आरोग्यपूर्ण मुलांची जबाबदारी असते, असे आपल्याला दिसून येते. समाजातील सर्व घटकांनी मिळून कुपोषण दूर करण्यासाठी योगदान देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ.अशोक बेलखोडे यांनी आज केले.

प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो (महाराष्ट्र गोवा राज्य), पुणे, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो, अहमदनगर, पत्र सूचना कार्यालय, मुंबई आणि महिला बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण मासानिमित्त आयोजित विशेष वेबीनार मध्ये डॉ.बेलखोडे बोलत होते.

राष्ट्रीय पोषण माह बालकांचा आहार व कुपोषणाची कारणे’ या विषयावरील मार्गदर्शनपर वेबीनारमध्ये डॉ. अशोक बेलखोडे, राज्यस्तरीय कुपोषण) गाभा समिती सदस्य तसेच मराठवाडा वैधानिक विकास मंडळ सदस्य व आरोग्य समिती अध्यक्ष मनोज ससे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद, अहमदनगर आणि सोपान ढाकणे, बाल विकास प्रकल्प अधिकारी, नेवासा, अहमदनगर यांचा सहभाग घेतला.

लहान वयात होणान्या लग्नामुळे कमी वजनाची बालके जन्मास येतात. १८ वयाआधी लग्न होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात अजूनही ३५ ते ३९ टक्के असल्याचे डॉ. बेलखोडे यांनी लक्षात आणून दिले. कुपोषित बालके जन्मास येणे आणि रक्तक्षय असलेल्या माता यामध्ये भारत अग्रस्थानी आहे, याकडेही त्यांनी लक्ष वळविले.

भेदभाव न करता मुलामुलींना समान, योग्य आहार गरजेचा भावी माता म्हणून मुलींना लक्षपूर्वक आहार देणे गरजेचे. हिमोग्लोबीन योग्य राहण्यासाठी प्रयत्न आणि आई होण्यासाठी सक्षम झाल्यानंतरच लग्न हे विषय गांभीर्याने घ्यायला हवे, असेही त्यांनी नमूद केले.

आदिवासी, ग्रामीण भागात डॉक्टरांनी काही वर्षे सेवा द्यावी. मजूरी करणाऱ्या महिला देखील बाळंतपणात सहा महिन्याची रजा मिळावी. आईला सुशिक्षित करण्यासाठी समाजातील शिक्षित जनसामान्य, आरोग्य सेवेकरी, सामाजिक कार्यकर्ते यांनी जबाबदारी घ्यावी, असे आवाहन डॉ. बेलखोडे यांनी याप्रसंगी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात कुपोषण विषयात अजूनही खूप काम करण्याची गरज असल्याबद्दल त्यांनी जाणीव करून दिली.

क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो, अहमदनगरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सोपान ढाकणे, बाल विकास प्रकल्प अधिकारी, नेवासा, अहमदनगर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, महिला बालकल्याण विभाग अधिकारी, कर्मचारी, जिल्ह्यातील नागरिक सहभागी झाले होते. सुमारे आठ हजार नागरिकांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!