Friday, October 22, 2021

नगर ब्रेकींग: वेटरचा खून करून पळालेल्यास अटक

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहरातील हॉटेल साक्षीमधील वेटरची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर शहरातील पुणे बस स्थानकात पकडले. आज (मंगळवारी) त्याला राहुरी पोलीस ठाण्यात स्वाधीन केले. नामदेव केशव दराडे (वय ३०, रा. गोळेगाव, ता. शेवगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

राहुरी येथे नगर-मनमाड महामार्गावरील हॉटेल साक्षीमध्ये शनिवारी (ता. १८) रात्री झोपलेल्या दोन वेटरमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले. मध्यरात्री दीड वाजता आरोपीने सोनू नामदेव छत्री (वय २७, रा. जोडवाडी, ता. गेवराई, जि. बीड) या वेटरच्या डोक्यात लोखंडी पहारीने प्रहार करुन, निर्घृण खून केला. त्यानंतर आरोपी पसार झाला.

रविवारी (ता. १९) सकाळी हत्येची घटना उघडकीस आली. अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्यासह नगरच्या ठसे तज्ञ व श्वान पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन, पंचनामा करून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. हॉटेल मालक प्रमोद बापुसाहेब म्हसे (वय २६, रा. कोंढवड) यांच्या फिर्यादीवरून आरोपी नामदेव मामा (पूर्ण नाव माहीत नाही) विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

दरम्यान, पोलिसांची तीन पथके आरोपीचा शोध घेत होती. नगर शहरातील पुणे बस स्थानकात आरोपी आल्याची खबर नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्यासह पथकाने आरोपीला ताब्यात घेऊन, विश्वासात घेतले. आरोपीने

 पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली आहे. मृत छत्री मूळचा नेपाळ देशातील आहे. त्याच्या नातेवाईकांचा पोलीस शोध घेत आहेत.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!