Friday, October 22, 2021

नगर जिल्ह्यातील तो अश्लील शिवीगाळीचे व्हिडिओ करायचा व्हायरल मग घडली अशी अद्दल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी असलेला तरुण गावात ग्रामस्थ आणि महिलांसाठी त्रासदायक बनला होता. तो प्रत्यक्ष त्रास तर देत होताच, शिवाय स्वत:चे अश्लील शिवीगाळ करणारे व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करीत असे. मात्र, त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यास कोणी धजावत नव्हते.

अखेर कर्जत पोलिसांना याची माहिती मिळाली. त्यांनी या तरुणाला अटक केली. त्याच्याविरुद्ध सामाजिक शांतता बिघडविल्याचा आरोप करून कोर्टात हजर केले. कोर्टाने त्याला आठ दिवस स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. त्याची रवानगी कोठडीत करण्यात आली. भविष्यातील गंभीर गुन्ह्यांना अटकाव करण्याच्या उद्देशाने ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.

कर्जत तालुक्यातील लोणी मसदपूर या गावातील ही घटना आहे. तेथे सचिन विठ्ठल आडागळे (वय २७) हा महिला आणि ग्रामस्थांना त्रास देत होता. त्याच्याविरुद्ध कर्जत पोलिस ठाणे तसेच पुण्यातील हडपसर पोलिस ठाण्यातही विविध गुन्हे दाखल आहेत. जामिनावर असताना तो गावात अशी गैरकृत्ये करीत होता.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना माहिती मिळाली. त्यांनी पोलिस पथक पाठवून त्याला अटक केली. त्याच्याकडून भविष्यात गंभीर गुन्हे घडू नयेत, याची दक्षता म्हणून त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपी आडागळे याला आठ दिवस स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला.

त्यानुसार त्याची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे. त्याच्या त्रासापासून काही काळ तरी सुटका झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.यासंबंधी पोलिस निरीक्षक यादव यांनी सांगितले की, महिलांना त्रास देण्याच्या अशा प्रकारातून पुढे गंभीर गुन्हे घडू शकतात. त्यामुळे गावकऱ्यांकडून यासंबंधी

तक्रार येताच पोलिसांनी गांभीर्याने घेत कारवाई केली. तांत्रिकदृष्ट्या त्याच्याविरुद्ध थेट गुन्हा दाखल करणे शक्य नव्हते. त्यामुळे भविष्यातील त्याच्या गुन्ह्यांना वेळीच अटकाव घातला जावा, यासाठी त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...

जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना नगरचे पालकमंत्री जनतेला लुटत होते

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका...

विखे-पाटील यांना नैराश्याने ग्रासले

माय महाराष्ट्र न्यूज : भाजपचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती देशाच्या, जनतेच्या हिताची नाही. त्यामुळे राज्यात किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार येत्या महापालिका...

बापरे:कोरोनाचा नव्या रुपातील विषाणू आढळून आला

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे शंभर कोटीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त डॉ. मांडे यांच्याशी सीएसआयआर मुख्यालयात सकाळने संवाद साधला. कोरोनाचा नव्या रुपातील...
error: Content is protected !!