Monday, October 25, 2021

सावधान! 1 ऑक्टोबरपासून या बँकांचं चेकबुक वापरून करता येणार नाही पेमेंट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही जर ओरिएंटल बँक, अलाहाबाद बँक आणि यूनाइटेड बँक ऑफ इंडिया चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 1 ऑक्टोबरपासून या बँकांचे जुने चेकबुक रद्द होणार आहे. ओरिएंटल आणि यूनायडेट बँकेचं पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलिनीकरण झाल्याने या बँकांचे जुने चेकबुक रद्द केले जाणार आहे.

1 एप्रिल 2020 पासून हे विलिनीकरण झाले आहे. त्यामुळे या बँकांचे जुने चेकबुक 1 ऑक्टोबरपासून अमान्य असणार आहे.1 ऑक्टोबरपासून नाही चालणार जुनं चेकबुक:पंजाब नॅशनल बँकेने एका ट्वीटद्वारे म्हटले आहे की, 1 ऑक्टोबरपासून ओबीसी आणि यूबीआय बँकांची जुनी चेकबुक पैसे भरण्यासाठी किंवा बँकेतून पैसे काढण्यासाठी काम करणार नाहीत.

ग्राहकांना नवीन चेकबुक घ्यावे लागेल. ज्यांच्याकडे जुने चेकबुक आहे त्यांनी ते बदलून घ्या. आता नवीन चेकबुक नवीन IFSC कोड आणि PNB चा IMCR नंबरसह तुम्हाला मिळेल.तुम्ही बँकेच्या शाखेला भेट देऊन नवीन चेकबुक मिळवू शकता. ग्राहक ऑनलाइन अर्जही करू शकतात. तुम्ही इंटरनेट किंवा मोबाईल बँकिंगद्वारे ऑनलाईन चेकबुकसाठी अर्ज करू शकता.

जर तुम्हाला चेकबुक मिळवण्यात कोणतीही अडचण येत असेल तर तुम्ही कस्टमर केअरला देखील कॉल करू शकता. येथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. पीएनबीचा टोल फ्री क्रमांक 18001802222 आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!