Monday, October 25, 2021

पोस्टात: 1500रुपये करा जमा मिळतील 35 लाख रुपये

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गुंतवणुकीचे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. त्यातल्या अनेक पर्यायांमध्ये आकर्षक परताव्याचा दावाही केलेला असतो; मात्र त्यांपैकी अनेक पर्याय जोखीमयुक्त असतात, शेअर बाजारावर आधारित असतात. जोखीम कमी असलेल्या अनेक पर्यायांमधून मिळणारा परतावा तुलनेने कमी असतो; मात्र तो निश्चित परतावा असतो. त्यामुळे अनेक जण अशा कमी जोखमीच्या पर्यायात गुंतवणुकीला प्राधान्य देतात.

तुम्हीही असाच काही पर्याय शोधत असाल, तर पोस्ट खात्यातल्या गुंतवणुकीचा हा पर्याय तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. 19 ते 55 वर्षं वयाची कोणीही भारतीय व्यक्ती या विमा योजनेचा लाभ घेऊ शकते. या योजनेत कमीत कमी 10 हजार रुपयांपासून जास्तीत जास्त 10 लाख रुपयांपर्यंतचा विमा उतरवता येतो. या योजनेचा हप्ता मासिक, त्रैमासिक,

अर्धवार्षिक किंवा वार्षिक अशा अंतराने भरता येतो. हप्त्याच्या ठरलेल्या तारखेनंतर 30 दिवसांपर्यंत ग्राहकाला हप्ता भरण्यासाठी सवलतही दिली जाते. पॉलिसी सुरू असताना एखादा हप्ता भरायचा राहिल्यास पॉलिसी बंद पडते; मात्र तो हप्ता भरल्यानंतर पॉलिसी पुन्हा सुरू होते.ही पॉलिसी खरेदी केल्यानंतर चार वर्षांनंतर या पॉलिसीवर कर्जही घेता येऊ शकतं.

पॉलिसीला तीन वर्षं झाल्यानंतर ती सरेंडर करण्याचा पर्यायही उपलब्ध असतो; मात्र सरेंडर केल्यास त्याचा कोणताही लाभ मिळत नाही.पोस्ट खात्याकडून दिला जाणारा बोनस हे या योजनेचं सर्वांत मोठं आकर्षण आहे. प्रति वर्षी 65 रुपये प्रति 1000 रुपये असा अंतिम बोनस घोषित करण्यात आला आहे.एखाद्या व्यक्तीने वयाच्या 19व्या वर्षी 10 लाख रुपयांची ग्राम सुरक्षा पॉलिसी खरेदी केली

, तर 55 वर्षांसाठी मासिक प्रीमियम 1515 रुपये एवढा लागेल. 58 वर्षांसाठी 1463 रुपये, तर 60 वर्षांपर्यंत 1411 रुपये एवढा मासिक प्रीमियम भरावा लागेल. वयाच्या 55 व्या वर्षापर्यंतची पॉलिसी खरेदी केल्यास 31.60 लाख रुपये, 58 व्या वर्षापर्यंतची पॉलिसी खरेदी केल्यास 33.40 लाख रुपये, तर 60 व्या वर्षापर्यंतची पॉलिसी खरेदी केल्यास 34.60 लाख रुपये एवढा मॅच्युरिटी बेनिफिट मिळू शकेल.

पॉलिसीचं नामांकन करायचं असेल, किंवा ई-मेल आयडी, मोबाइल नंबर वगैरे बाबींमध्ये अपडेट्स करायचे असले, तर त्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधता येऊ शकतो. अन्य समस्या किंवा शंकांच्या निरसनासाठी 1800 180 5232/155232 या टोल फ्री हेल्पलाइनवर संपर्क साधता येऊ शकतो. www.postallifeinsurance.gov.in या अधिकृत वेबसाइटवरही सर्व प्रकारची माहिती मिळू शकते

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!