Saturday, October 23, 2021

 पुढचे ४८ तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: विकेंडनंतर राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या तुफान पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत आहेत तर हाच पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे. पुढच्या ४८ तासांमध्ये पावसाची तीव्रता आणखी वाढणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.

त्यामुळे नागरिकांनी आवश्यक असल्यास घराबाहेर पडावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, माथेरान, रायगड, ठाणे, मुंबई इथे मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तर पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधूदूर्ग, विदर्भामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे‌.

अहमदनगर, औरंगाबाद, बुलढाणा, कोल्हापूर, अकोला, परभणी आणि नांदेड हे जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर विदर्भातही अमरावती, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज बाहेर पडावं कारण यादरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

यंदा परतीचा पाऊस लांबणार असल्याचंही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. शेतकऱ्यांना खरिपातील पीक काढण्यासाठी पुरसा वेळ मिळणार आहे. त्यामुळे परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळेल. परतीचा पाऊस ऐनवेळी

दगा देत असल्याने दरवर्षी पीक पाण्यात वाहून जातात. पण यंदा लांबणीवर असलेल्या पावसामुळे पिकांची काढणी ही वेळेत करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...

फोन पे युजर्संना चांगला दणका! आता…

माय महाराष्ट्र न्यूज : पाणी आणि वीज बिल भरण्यासाठी, गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी, मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज करण्यासाठी किंवा ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी तसेच, तुम्ही...

रोहित पवार कडाडले:या भाजप नेत्यांला पैशांचा घमेंड,फोडाफोडीचे करतात राजकारण

माय महाराष्ट्र न्यूज:जळगाव जिल्ह्या दौऱ्यावर आज राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार आले. प्रथम त्यांनी मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर त्यांनी...

नगर जिल्हा पुन्हा हादरला:पतीने केला पत्नीचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यातून काही दिवसापासून कोण दरोडेखोर अत्याचार अन्याय या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे अहमदनगर...

सावधान:चिकन मुळे कोरोनापेक्षा ही मोठ्या व्हायरसचे संकट

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना काळात जगभरात लाखो जणांचे जीव या विषाणूने घेतले. आता संसर्गाचा बहर ओसरला असली, तरी तो पूर्णतः आटोक्यात आलेला नाही. दरम्यान आता...
error: Content is protected !!