माय महाराष्ट्र न्यूज:श्रीगोंदा तालुयातील बाबूर्डी येथील दशरथ शिर्के वय- ६० वर्ष या वृद्धाचा जमिनीच्या वादातून नव्हे तर अनैतिक संबंधातून खून झाल्याचे निष्पन्न झाले असून आरोपी अमोल आप्पा कुरुमकर (वय २८ वर्षे)
व अक्षय नानासाहेब वाघस्कर (वय २३ वर्षे, दोघे रा. वडाळी, ता. श्रीगोंदा) या आरोपींना श्रीगोंदा पोलीसांनी ४८ तासात अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे कि, जमिनीच्या
वादातून झालेल्या मारहाणीत दशरथ शिर्के या वृद्धाच्या डोक्यात टणक वस्तूने मारहाण करून खून करण्यात आला अशी फिर्याद मयताचा मुलगा श्रीरंग शिर्के यांच्या फिर्यादी वरुन रामा राजु बरकडे व बिट्या राजु बरकडे
यांच्यावर संशय घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.मात्र तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक समिर अभंग यांनी तपासाची सूत्रे फिरवली आणि हा खून शेतीच्या वादातून झाला नसुन अनैतिक संबंधातून झाला
असल्याचे निष्पन्न झाले. श्रीगोंदा तालुयातील वडाळी येथील अमोल आप्पा कुरुमकर याचे मयताच्या कुटुंबातील एका महिलेबरोबर अनैतिक संबंध होते. याबाबतची माहिती मयतास होती. त्यामुळे मयत व आरोपी
अमोल कुरुमकर यांच्यात वादविवाद व शिवीगाळ झाली होती. याचाच राग धरून कुरुमकर याने त्याचा मित्र अक्षय नानासाहेब वाघस्कर याला दि. ३ रोजी श्रीगोंदा येथील महमंद महाराजांची यात्रा असल्याने यात्रेत येऊन
यात्रेचा आस्वाद घेतला आणि एका हॉटेलमध्ये जाऊन मद्य प्राशन करून रात्री दोन ते अडीचच्या सुमारास त्यांनी बाबुर्डी येथील नगर दौंड हायवेवर शिरगाव बोडखा येथे असलेल्या मयताच्या चहाच्या टपरीमध्ये गाढ झोपेत असताना तिथे जाऊन
मयताच्या डोयावर लाकडी दांडयाने अमोल कुरुमकर याने जोरदार प्रहार करून जागीच ठार मारले. व त्यास मदत करणारे वागस्कर हे दोघे मोटारसायकलवर तेथून निघून गेले अशी काबुली आरोपींनी दिली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपविभागीय
अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग हे करीत आहेत,