Monday, October 18, 2021

या मराठी अभिनेत्रींचा अपघाती मृत्यू, नाकातोंडात पाणी गेल्याने गमावले प्राण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहरात वास्तव्यास असणारी मराठमोळी अभिनेत्री ईश्वरी देशपांडे हिचा २० सप्टेंबर रोजी अपघाती मृत्यू झाला. गोव्यातील बागा- कलंगुट येथे घडलेल्या या अपघातात ईश्वरीचा मित्र शुभम देगडे याचंही निधन झालं. सोमवारी २० सप्टेंबर रोजी पहाटे हा अपघात घडला. गोव्यातील बागा येथील अरुंद रस्त्याने जात असताना शुभमचा

गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी खाली असलेल्या खाडीत कोसळली. त्यातच गाडी लॉक झाल्याने दोघांच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.पोलीस निरीक्षक सुरज गवस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, गाडी चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा मोठा अपघात झाला. गाडीचं स्टिअरिंग फिरल्याने गाडी रस्त्याच्या कडेला गेली आणि खाडीत कोसळली.

सकाळी सात वाजता अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत त्या दोघांचे मृतदेह गाडीमधून बाहेर काढले.ईश्वरीने नुकतंच एका हिंदी आणि मराठी चित्रपटाचं चित्रीकरण केलं होतं. सोबतच तिने हिंदी आणि मराठी मालिकांचं चित्रीकरण देखील पूर्ण केलं होतं. अलीकडे ईश्वरी काही मराठी मालिकांमध्येही झळकली होती. यापूर्वी अनेक हिंदी मालिकांमध्येही ईश्वरीने काम केलं आहे.

ईश्वरी आणि शुभम गेली अनेक वर्ष एकमेकांना ओळखत होते. या ओळखीचं प्रेमात रूपांतर झाल्याने ते गेले काही महिने एकमेकांना डेट करत होते. पुढच्या आठवड्यात ईश्वरी आणि शुभम साखरपुडा करणार होते. मात्र त्यांचा संसार सुरू होण्यापूर्वीच संपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!