Friday, October 22, 2021

राज्यपालांनी विरोधीपक्षाचे थोबाड फोडले पाहिजे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यपालांनी विशेष अधिवेशनाची मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खरमरीत पत्र लिहिले आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही राज्यपालांना चांगलाच टोला लगावला आहे. ‘जर विरोधीपक्ष राज्याची बदनामी करत असेल. जे चिखलफेक करीत असेल तर

त्यांनी विरोधी पक्षाचं थोबाड फोडला पाहिजे, त्यांचे कान उपटले पाहिजे राज्यपाल मात्र त्यांना राजभवनात बसून उत्तेजना देत आहे’ असा घणाघाती टोला राऊत यांनी राज्यपालांना लगावला आहे.’महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी अशा प्रकारची गंमत नेहमी करत असतात. भाजप शासित राज्यात यापेक्षा जास्त मोठ्या घटना घडत असतात.

गुजरातमध्ये रोज 3 बलात्काराच्या घटना घडता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आणि परखड आहे. हा राज्याचा विषय नाही हा राष्ट्रीय विषय आहे. भाजपशासित राज्यांमध्ये अनेक घटना घडत असतात. गुजरातच्या राज्यपालांनी अधिवेशन घेण्याचे ठरविले तर दोन दिवसाचा नाही तर एका महिन्याचा घ्यावं लागेल’ असा टोला राऊत यांनी लगावला.

‘महाराष्ट्राच्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांसोबत उभा दावा मांडला आहे. हे आता स्पष्ट दिसत आहे. पत्र मीडियाकडे लिंक करण्याची गरज नव्हती. राज्यपाल हे राज्याचे पालक आहे पण राज्याची बदनामी करून काय साधायचे आहे. जर विरोधीपक्ष राज्याची बदनामी करत असेल. जे चिखलफेक करीत असेल तर त्यांनी विरोधी पक्षाचं थोबाड फोडला पाहिजे, त्यांचे कान उपटले पाहिजे.

राज्यपाल मात्र त्यांना राजभवनात बसून उत्तेजना देत आहे’ अशी टीकाही राऊत यांनी राज्यपालांवर केली.राज्यपालांच्या विरोधामध्ये एक दिवस दिल्लीत येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सांगावे लागेल की राजभवनात काय सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचं पत्र हे दस्तावेज आहे हा दस्तावेज आता राजभवनाच्या पटलावर आहे.

राज्यपाल यांनी झाकली मूठ उघडण्याची गरज नव्हती आता त्यांनी मूठ उघडली आहे. राज्यपालांचे आ बैल मुझे मार असं काम केलं आहे. आता फक्त मूठ उघडली आहे, अजून काही उघडायला लावू नका’ अशा इशाराही राऊत यांनी दिला.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...

जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना नगरचे पालकमंत्री जनतेला लुटत होते

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका...

विखे-पाटील यांना नैराश्याने ग्रासले

माय महाराष्ट्र न्यूज : भाजपचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती देशाच्या, जनतेच्या हिताची नाही. त्यामुळे राज्यात किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार येत्या महापालिका...

बापरे:कोरोनाचा नव्या रुपातील विषाणू आढळून आला

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे शंभर कोटीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त डॉ. मांडे यांच्याशी सीएसआयआर मुख्यालयात सकाळने संवाद साधला. कोरोनाचा नव्या रुपातील...

नगरमध्ये दोन भावांकडून महिलेची छेडछाड लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत…

माय महाराष्ट्र न्यूज:दोन भावांनी एका विधवा महिलेची छेडछाड करीत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून विकास शामसुंदर गायकवाड...

फडणवीसांची जिरवायची हे गडकरींसोबत आधीच ठरलं होत: काँग्रेस नेत्यांचा खळबळजनक दावा

माय महाराष्ट्र न्यूज:नांदेड इथल्या बिलोली येथे आयोजित प्रचारसभेत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाला बहुमत जरी...
error: Content is protected !!