Saturday, October 23, 2021

नगर जिल्ह्यातील राजकारण तापणार: किरीट सोमय्या यादिवशी नगर जिल्ह्यात

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी करावी अशी मागणी कारखाना बचाव समितीने सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) केली आहे. पारनेर कारखाना बचाव समितीच्या प्रतिनिधींनी नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवत कराड व ईडीचे मुख्य संचालक संजय मिश्रा यांची दिल्ली येथे भेट घेऊन ही मागणी केली आहे

या पार्श्वभूमीवर खासदार सोमय्या गुरूवारी अहमदनगर जिल्ह्यातील दौऱ्यावर येत आहेत. यात ते पारनेर, कर्जत व जामखेड येथे भेटी देणार आहेत.पारनेर कारखाना बचाव समितीने कारखाना विक्रीनंतर लगेचच यातील गैरव्यवहाराची तक्रार केली होती. क्रांती शुगरकडे पैसे नसतानाही 32 कोटी रूपयांना हा कारखाना कसा विकत घेतला. तसेच राज्य सहकारी बँकेने कारखाना

विक्रीची बोगस प्रक्रीया राबविला असल्याचा अक्षेप बचाव समितीने घेतला आहे. या कारखाना विक्रीतील भ्रष्टाचार बाबत औरंगाबाद खंडपीठात तीन याचिका दाखल आहेत. या बाबत समितीने पंतप्रधान कार्यालय व केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडेही तक्रार दाखल केली आहे.दिल्ली येथे बचाव समितीने समाजसेवक माणिक जाधव व भारतीय जनता पक्षाचे

माजी खासदार किरीट सोमय्या यांची भेट घेतली. त्या वेळी सोमय्या यांनी कारखाण्याचे सभासद व शेतकरी यांच्याशी संवाद साधण्यासाठी येणार आहे असे अश्वासन दिले होते. त्या नुसार सोमय्या हे गुरूवारी (ता. 23) पारनेरला येत आहेत. प्रथम कारखाना स्थळावर सभासद व शेतकरी यांच्याशी त्या नंतर ते पारनेर येथे येणार असून तेथे तीन वाजता पत्रकार परीषदही घेणार आहेत.

 

 

पारनेर कारखाना खरेदीतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दोन वर्षांपूर्वीच दिले होते. बचाव समितीने सर्व पुरावे देऊन ईडी कडे पाठपुरावाही केला होता. मात्र त्याची दखल न घेतल्यामुळे ईडी च्या विरोधात मुंबई येथे 20 ऑक्टोबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशाराही बचाव समितीने दिला आहे.

ताज्या बातम्या

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...

फोन पे युजर्संना चांगला दणका! आता…

माय महाराष्ट्र न्यूज : पाणी आणि वीज बिल भरण्यासाठी, गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी, मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज करण्यासाठी किंवा ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी तसेच, तुम्ही...
error: Content is protected !!