Saturday, October 23, 2021

शिवाजी कर्डिलेंची विधानपरिषदेसाठी जोरदार मोर्चेबांधणी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीने अनेक राजकीय गणिते बदलली. दिग्गजांना धक्का देत युवा नेतृत्त्वाचा या निवडणुकीत उद्य झाला. मंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार, नीलेश लंके, किरण लहामटे, आशुतोष काळे यांच्यासह लहू कानडे यांनाही प्रथमच विधानसभेत प्रतिनिधीत्त्व करण्याची संधी मिळाली.

याच वेळी दिग्गजांच्या समोर राजकीय अस्तित्त्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यातील एक महत्त्वाचं नाव म्हणजे माजी मंत्री शिवाजी कर्डिले.विधानसभा निवडणुकीत भाजपचे माजी मंत्री राम शिंदे, शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मरकुटे व स्नेहलता कोल्हे यांचा पराभव भाजपला मोठा धक्का मानला जात होता.

यातील कर्डिले यांचे सोशल नेटवर्क मोठे आहे. एकाच वेळी पारनेर, श्रीगोंदे, नगर शहर, पाथर्डी व राहुरी या पाच मतदार संघांत त्यांचे कार्यकर्ते आहेत.बुऱ्हाणनगरचे सरपंच ते मंत्रीपद व जिल्हा बँकेचे अध्यक्षपद असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. कर्डिलेंचे राजकारण हे सोयऱ्या धायऱ्यांचे व सोयीचे राजकारण असल्याची टीका नेहमी त्यांच्यावर होते.

विधानसभेच्या पराभवानंतर कर्डिले संपले असे अनेकांना वाटले होते. याचाच फायदा घेत अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत त्यांची कोंडी करण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला होता. मात्र कर्डिलेंनी विरोधकांचे सर्व डाव उलटवत विरोधकांना आस्मान दाखवले.

जिल्हा बँकेतील विजयामुळे शिवाजी कर्डिले यांनी विधानपरिषदेची तयारी सुरू केली आहे. कर्डिले यांचे मित्र सर्वच पक्षांत आहे. जिल्हा बँकेमुळे त्यांचे नेटवर्क जिल्हाभर पसरले आहे. याचाच फायदा घेत त्यांनी विधानपरिषदेसाठी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. मात्र जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांत भाजप पेक्षा महाविकास आघाडीची ताकद जास्त आहे. यावर कर्डिले कोणती औषधी वापरतात यातच त्यांचे राजकीय यश आहे.

 राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप हे कर्डिले यांचे व्याही आहेत. ते तब्बेतीच्या कारणाने आगामी निवडणूक लढतील याची शक्यता कमी आहे. त्यामुळे कर्डिलेंकडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

कर्डिले कोणत्या पक्षातून निवडणूक लढवतील हे काळच ठरवेल. मात्र कर्डिले यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी गाठी भेटी घेणे, जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांशी संपर्क ठेवणे त्यांनी सुरूच ठेवले आहे.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!