Wednesday, October 27, 2021

खूशखबर:पीएम किसान योजनेअंतर्गत ४,००० रुपयांचा लाभ घेण्याची शेवटची संधी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आणि खुशखबर आहे. जर तुम्हालादेखील पीएम किसान चा ९वा हफ्ता मिळाला नसेल तर तुम्ही एकरकमी ४,००० रुपयांचा लाभ घेऊ शकता. याचबरोबर आगामी दिवसांमध्ये सरकार पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम दुप्पट देखील करण्याची शक्यता आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत तुम्हाला ४,००० रुपयांचा लाभ कसा मिळू शकतो ते पाहूया. 

पीएम किसान सम्मान निधी योजना:ज्या पात्र शेतकऱ्यांनी अद्याप पीएम किसान सम्मान निधी स्कीममध्ये आपले नाव नोंदवलेले नाही त्यांना ३० सप्टेंबर पर्यत पीएम किसान योजनेत आपले नाव नोंदवण्याची संधी आहे. मुदतीच्या आत त्यांनी नोंदणी केल्यास त्यांना ४,००० रुपयांचा लाभ मिळू शकतो.

कारण त्यांना लागोपाठ दोन हफ्ते म्हणजे ४,००० रुपये यातून मिळू शकतात. जर पात्र शेतकऱ्यांची नोंदणी झालीतर त्यांना ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये २,००० रुपये मिळतील. यानंतर डिसेंबरमध्ये २,००० रुपयांना आणखी एक हफ्ता त्यांच्या खात्यात जमा होईल.

तुमचे बॅंकेत खाते असणे आवश्यक आहे. कारण सरकार सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करते. तुमचे बॅंक खाते आधारशी लिंक असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे आधार कार्ड असले पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. पीएम किसानची वेबसाईट असलेल्या pmkisan.gov.in या

वेबसाइटवर आपले कागदपत्रे अपलोड करा. आधारला लिंक करण्यासाठी Farmer Corner च्या पर्यायावर जा आणि Edit Aadhaar Detail च्या पर्यायावर क्लिक करून अपडेट करा.पीएम किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत सरकारने आतापर्यत ९ हफ्ते जमा केले आहेत. पहिला हफ्ता २,००० रुपयांच्या

रुपाने ३,१६,०६,६३० शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. तर नववा हफ्ता आतापर्यत ९,९०,९५,१४५ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. ३० नोव्हेंबरपर्यत उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात ९वा हफ्ता जमा केला जाणार आहे. पीएम किसान योजनेची सुरूवात २०१८मध्ये झाली होती.

याचा हेतू २०२२ पर्यत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा आहे.पीएम किसान योजनाया: योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकरी कुटुंबांना ६,००० रुपये वार्षिक स्वरुपात त्यांच्या बॅंक खात्यात जमा केले जातात. ही रक्कम २,००० – २,००० रुपयांच्या तीन हफ्त्यात जमा केली जाते. या योजनेअंतर्गत आतापर्यत १.३८ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त सम्मान रक्कम शेतकरी कुटुंबांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!