माय महाराष्ट्र न्यूज:देशातील बाजारात आज कापसाची आवक घटली होती. त्यामुळं देशातील अनेक बाजारांमध्ये कापसाच्या किमान आणि कमाल दरात सुधारणा पाहायला मिळाली.
तर आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र चढ उतार सुरुच होते.होळीमुळे कापसाची आवक कमी होती म्हणून दरात सुधारणा पाहायला मिळाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं.देशातील अनेक
महत्वाचे बाजार आज होळीनिमित्त बंद होते. मात्र काही ठिकाणी व्यवहारही पार पडले. होळीमुळे कापसाची आवक घटली होती.दरचा विचार करता आज कापूस दरात क्विंटलमागं १०० रुपयांची सुधारणा
पाहायला मिळाली. किमान दर आज अनेक बाजारांमध्ये ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान पोचला होता.तर सरासरी दरपातळी ७ हजार ८०० ते ८ हजार ४०० रुपयांची होती. काही बाजारांमधील कमाल दरातही काल सुधारणा दिसून आली.
सरकीच्या दरातही काल काही ठिकाणी सुधारणा झाली होती. आज सरकीला सरासरी ३ हजार २०० ते ३ हजार ५०० रुपये भाव मिळाला. तर सरकी ढेपेचे दर काही बाजारांमध्ये क्विंटलमागं ५० ते १०० रुपयाने
सुधारले होते. आज सरकी ढेपेला सरासरी २ हजार ८०० ते ३ हजार १०० रुपयांचा दर मिळाला.आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात चढ उतार सुरु आहेत. आज कापसाचे वायदे सायंकाळपर्यंत काहीसे कमी
होऊन ८४ सेंटवर पोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात चढ उतार सुरु असले तरी सरासरी दरपातळी टिकून आहे.अमेरिकेच्या कापसाला चीन आणि पाकिस्तानकडून उठाव मिळतोय. त्यामुळं दर टिकून आहेत.
देशातही सूतगिरण्यांकडून कापसाला उठाव आहे. निर्यातही सुरळीत आहे. सरकी पेंड आणि तेलाकडूनही आता आधार मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळं देशात कापसाचे भाव सुधारण्यास अनुकूल स्थिती आहे.
मात्र उद्योगांकडून दर दबावात ठेवले जात आहेत.