Monday, October 25, 2021

जबरदस्त:आता रेशन दुकानातही काढता येणार हे दोन म्हत्वाचे कार्ड, इतरही अनेक सुविधा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: सर्वसामान्य नागरिकांच्या घराजवळ अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचललं आहे. देशातील सर्व रेशन दुकानं आता कॉमन सर्व्हिस सेंटर बनवली जाणार असून अऩेक सुविधा नागरिकांना या ठिकाणी पुरवण्यात येणार आहेत

अन्न मंत्रालयाच्या कक्षेत रेशन धान्याची दुकानं येतात. या मंत्रालयानं ई-गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेडसोबत एकत्र येत ही योजना तयार केली आहे. यामुळे रेशन दुकानांचं उत्पन्न वाढायलाही मदत होणार आहे. रेशन दुकानातून धान्य खरेदी करतानाच नागरिक पासपोर्ट आणि पॅन कार्डसाठी अर्जही भरू शकणार आहेत. वीज आणि पाण्याचं बिलदेखील रेशन दुकानांमध्ये स्विकारलं जाणार आहे.

रेशन धान्य दुकान चालवणाऱ्या दुकानदारांना कुठल्या सुविधा पुरवायच्या, याची निवड करता येणार आहे. सीएससीअंतर्गत विविध सुविधा पुरवल्या जाणार असल्या तरी आपल्याला योग्य वाटतील अशा सेवांसाठी रेशन दुकानदार अर्ज करू शकतील. सर्वच्या सर्व किंवा काही निवडक सुविधा आपल्या दुकानात उपलब्ध करून देण्याचा पर्याय रेशन दुकानदारांसमोर असणार आहे.

निवडणूक आयोगाशी संबंधित सेवाही मिळणार:रेशन दुकानांमध्ये पासपोर्टसाठी अर्ज, पॅन कार्डसाठी अर्ज, लाईट बिल भरणे, पाण्याचं बिल भरणे आणि निवडणूक आयोगाशी संबंधित कामांची सुविधादेखील उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे. या सुविधांचा सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच उपयोग होणार असून या कामांसाठी करावी

लागणारी पायपीट कमी होणार आहे. या सुविधा इतरत्रही उपलब्ध आहेत, मात्र त्यात आता आणखी एका पर्यायाची भर पडणार आहे. रेशन दुकानधारकांचं उत्पन्न वाढायलाही या निर्णायामुळे मदत होणार आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!