Friday, October 22, 2021

नगर ब्रेकींग: विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील विविध दोन घटनांमध्ये शॉक लागून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूत पती-पत्नीचा समावेश आहे तर दुसऱ्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पाथर्डी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पाथर्डी तालुक्यातील सांगावी खुर्द गावात सांगवी खुर्द येथील कटारनवरे वस्तीवर शोभा मच्छिंद्र कटारनवरे (वय-४० वर्षे) या धुणे वाळायला टाकत होत्या.त्यावेळी त्यांना विजेचा शॉक बसला व त्या जोरात ओरडल्या त्यामुळे त्यांचे पती मच्छिंद्र कोंडीबा कटारनवरे (वय-४३ वर्षे) हे त्यांच्या मदतीला धावले.

मात्र या दोघांनाही विजेचा शाँक बसला आणि ते जागीच मरण पावले. कटारनवरे यांचा मुलगा होमगार्डमधे जवान म्हणुन काम करीत आहे. सांगवी गावावर शोककळा पसरली. या दाम्पत्यावर गावातच अंतीम संस्कार करण्यात आले.माणिकदौंडी भागातील शिंदेवाडी येथील बबन मोहन शिंदे (वय ५५) यांच्या

अंगावर विजेची वायर तुटून पडल्याने राहत्या घरा समोर त्यांचा जागीच मृत्यू झाला. शिंदे हे दुपारी शेतीचे काम करत असताना वारा पाऊस जोरात सुरू होता. त्यावेळी विजेच्या खांबावरून वीज प्रवाह घरात घेऊन जाणारी केबल शिंदे यांच्या अंगावर पडली. यात शिंदे यांचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!