Monday, October 25, 2021

शिर्डीच्या साई मंदिरात घडला तो प्रकार, फोटो व्हायरल झाले म्हणून अधिकाऱ्यासह पाचजणांना अटक

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:साईबाबा मंदिर व परिसरात सध्या कोरोनामुळे साईभक्तांना बंदी आहे, तसंच साई मंदिराची सुरक्षा ध्यानात घेऊन शिर्डीतील साई मंदिरातील कोणाचेही फोटो किंवा व्हिडिओ बाहेर सोशल माध्यमावर व्हायरल करणे हे गुन्हा आहे, तसा साई संस्थान ने 2018 मध्ये ही नियमच केला होता. शासनानेही यासंदर्भात संस्थांनला सूचना केल्या होत्या.

मात्र, या नियमाचा भंग करत संस्थान प्रशासनाने व त्यांच्या अधिकाऱ्यांनी शिर्डीत साई मंदिरामध्ये 31 ऑगस्ट 20 21 रोजी श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश आणि समितीचे सदस्य धर्मदाय आयुक्त अहमदनगर हे उपस्थित असल्याचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले होते. हे फोटो व्हायरल झाल्यामुळे प्रधान जिल्हा न्यायाधीश

तसा धर्मादाय आयुक्त यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता, तशी तक्रारही सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केली होती.या तक्रारीनंतर साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप यांच्यासह अजित जगताप, विनोद कोते, राहुल फुंदे, सचिन गव्हाणे आणि चेतक साबळे या सर्वांवर मंदिर सुरक्षा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या फिर्यादीवरून

501,408,465,469, 34, 66 (B), 2 (1), 66,43, 443 (B), 43 (G), 84,5 अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. अटकेचे वृत्त शिर्डीत येताच साईभक्त ग्रामस्थ यांच्यामध्ये चर्चेला उधाण आले आहे.साईबाबा संस्थानची तसेच साई मंदिराची सुरक्षा महत्त्वाचे असताना व तसा नियम कायदा असताना त्याप्रमाणे कोरोना काळात इतर साईभक्तांना प्रवेश

नसताना संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश मंदिरात गेल्याचे फोटो व्हायरल झाले होते. आता चौकशीअंती सविस्तर माहिती पुढे येईल. संस्थांच्या प्रशासकीय अधिकाऱ्याला अटक होण्याचा शिर्डी संस्थान इतिहासात पहिलाच प्रकार शिर्डीत घडत आहे त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

संबधित प्रकरणात अटक झालेल्या अधिकाऱ्यांना नेमके कोणाच्या आदेशाने अध्यक्ष असलेल्या न्यायाधिशांची बदनामी आणि रेकी करणारे फोटो समाजमाध्यमात पाठवण्याचा कोणाचा आदेश झाला हे स्पष्ट होणार आहे.. यामुळे मात्र आएस अधिकारी कान्हूराज बगाटे अडचणीत येण्याची शक्यता आहे. या संदर्भात अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक

मनोज पाटील यांच्या आदेशाने व शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील हे करत आहेत.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!