माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत- जामखेडमध्ये लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याचे ट्विट भाजप नेते राम शिंदे यांनी केले आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.कर्जत -जामखेडमधील इतर पक्षातील कार्यकर्ते भाजपमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत.त्यामुळे आता राष्ट्रवादीला खिंडार पडणार की अन्य दुसऱ्या कोणत्या पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार? हे येत्या काही
दिवसांतच पाहायला मिळणार आहे.कर्जत -जामखेड जि.नगरमधील इतर पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये
मोठ्या प्रमाणात इतर पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश. असं ट्विट राम शिंदे यांनी केलं आहे.कर्जत- जामखेडमध्ये लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याचे ट्विट राम शिंदे
यांनी केले आहे. त्यामुळे जामखेडमध्ये राष्ट्रवादीला खिंडार पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.जर असं झालं तर आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
राम शिंदे विधानपरिषदेवर आमदार झाल्यानंतर कर्जत- जामखेडचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.