Monday, October 25, 2021

नगरमध्ये अधिकारी पतीला सरकारी कार्यालयात येऊन पत्नीनेच केली ….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर मध्ये पती कार्यालयात काम करत असताना पत्नीने तेथे येऊन पतीला शिवीगाळ करत फाईली फेकून दिल्याची घटना येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात घडली. याप्रकरणी पती विजयकुमार दिलीप वाईकर (वय 30 रा. गुलमोहर रोड, सावेडी) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात

दिलेल्या फिर्यादीवरून त्यांची पत्नी मयुरी विजयकुमार वाईकर व उज्ज्वला प्रकाश कुंभार (रा. नागठाणे जि. सातारा) यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.विजयकुमार वाईकर तारकपूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात अधिकारी म्हणून काम करतात. सोमवारी ते कार्यालयात काम करत असताना त्यांची पत्नी मयुरी तेथे आली.

ती विजयकुमार यांना म्हणाली, तु तुझ्या पगाराच्या स्लीपा मला दे, असे म्हणून आरडाओरडा करून विजयकुमार यांना शिवीगाळ केले. जर पगाराच्या स्लीपा दिल्या नाही तर मी माझ्या जीवाचे बरेवाईट करेल, अशी धमकी देऊन विजयकुमार यांच्याकडील फाईली हिसकावून घेत फेकून दिल्या. यानंतर मयुरीने उज्ज्वला कुंभारे हिला फोन केला व तो फोन

विजयकुमार यांच्याकडे दिला. तेव्हा उज्ज्वलाने विजयकुमार यांना शिवीगाळ केले. विजयकुमार मिटींगसाठी जात असताना मयुरीने त्यांना जाण्यास अटकाव करत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके करीत आहे.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!