Monday, October 25, 2021

मोठी बातमी:भारतातून कोरोना हद्दपार होणार ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने थैमान घातलं आहे. प्रत्येकजण कोरोना कधी संपूर्णपणे नष्ट होणार हा प्रश्न विचारतोय. मात्र यासंदर्भात देशातील टॉप वॅक्सिन एक्सपर्टने दिलेल्या उत्तरामुळे चिंतेत भर पडणार आहे. वॅक्सिन एक्सपर्ट डॉ. गगनदीप कांग म्हणाले की, भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग हा ‘एंडेमिसिटी’च्या दिशेने वाटचाल करतोय.

डॉ. कांग यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, हा व्हायरस देशातील कधीही न संपणारा आजार बनत चालला आहे.डॉ. कांग यांच्या सांगण्यानुसार, साथीच्या तिसऱ्या लाटेचं रूप धारण करण्यासाठी स्थानिक पातळीवर संक्रमण देशभरात पसरेल, परंतु ते पूर्वीसारखं नसेल. कोणत्याही रोगासाठी एंडेमिक तो टप्पा आहे.

ज्यामध्ये लोकसंख्या त्या विषाणूसह जगणं शिकतात. हे मोठ्या संख्येने लोकसंख्येला व्यापलेल्या महामारीपेक्षा खूप वेगळं आहे.एका इंटरव्यू दरम्यान डॉ. कांग म्हणाले, देशात दुसऱ्या लाटेचा फटका सुमारे एक तृतीयांश लोकसंख्येला बसला. “मग आपण तिसऱ्या लाटेत तीच परिस्थिती उद्भवू शकते का जी दुसऱ्या लाटेत पहायला मिळाली? मला वाटतं की त्याची शक्यता कमी आहे.

आम्ही स्थानिक पातळीवर संक्रमणाचा प्रसार पाहणार आहोत जो स्वरूपात असेस आणि देशभरात पसरलेला असेल. ती तिसरी लाट बनू शकते आणि जर आपण सणांबद्दल आपला दृष्टीकोन बदलला नाही तर ते होऊ शकतं. पण त्याची स्केल आपण आधी पाहिल्याप्रमाणे असणार नाही, असंही डॉ. कांग म्हणाले.

वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक कांग म्हणाले, “जेव्हा तुमच्याकडे असं काही आहे जे नजीकच्या भविष्यात संपणार नाही, तेव्हा ते एंडेमिक परिस्थितीत जात आहे.” या क्षणी आम्ही SARS-CoV2 विषाणू नष्ट करण्याच्या दिशेने काम करत नाहीये, याचा अर्थ तो एंडेमिक बनला आहे.”

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!