Sunday, July 3, 2022

IPL वर पुन्हा करोनाचं संकट?;या खेळाडूंला लागण; संपर्कातील सहा जण विलगीकरणात

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आयपीएलवर पुन्हा एकदा करोनाचं संकट निर्माण झालं आहे. सनरायजर्स हैदराबादचा गोलंदाज टी नटराजनला करोनाची लागण झाली आहे. आरटीपीसीआर चाचणी केली असता टी नटराजनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती आयपीएलने दिली आहे. टी नटराजनला करोनाची कोणतीही

लक्षणं जाणवत नसून सध्या इतर सहकाऱ्यांपासून अंतर ठेवत विलगीकरणात आहे. सनरायजर्स हैदराबादचा आज दिल्ली कॅपिटल्ससोबत सामना होणार आहे. करोनामुळे आयपीएल स्थगित केल्यानंतर पुन्हा एकदा दुबईत खेळलं जात असून हैदराबादचा हा पहिलाचा सामना आहे.

दरम्यान टी नटराजनसोबत हैदराबादचा आणखी एक खेळाडू विजय शंकर आणि पाच सदस्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. हे सर्वजण टी-नटराजनच्या संपर्कात आले होते अशी माहिती देण्यात आली आहे.आयपीएलकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, “स्थानिक वेळेनुसार पहाटे पाच वाजता जवळच्या

संपर्कातील आणि इतरांची आरटीपीसीआर टेस्ट केली असता रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यामुळे आज दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये होणारा सामना ठरल्याप्रमाणे पार पडेल”.टी-नटराजनच्या संपर्कात आलेले ते सहाजण ज्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे त्यामध्ये विजय शंकर, टीम मॅनेजर विडय कुमार, फिजिओथेरपिस्ट श्याम सुंदर जे,

डॉक्टर अंजना वन्नन, लॉजिस्टिक मॅनेजर तुषार खेडकर. नेट गोलंदाज पेरियासॅमी गणेशन यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!