Wednesday, October 27, 2021

उद्या किरीट सोमय्यांची पारनेरच्या क्रांती शुगर कारखानाला भेट;काय आहे प्रकरण जाणून घ्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आत आपला मोर्चा नगर जिल्ह्यातील पारनेरकडे वळवला आहे.पारनेर साखर कारखाना विक्री घोटाळा चोकशी प्रकरणी कृती समितीच्या वतीने थेट ईडीकडे चोकशीची मागणी करण्यात आली आहे. कारखान्याच्या शेतकरी सभासदांशी व इतर प्रश्नांबाबात चर्चा

करण्यासाठी उद्या (23 सप्टेंबर) माजी खासदार किरीट सोमय्या पारनेर येथील क्रांती शुगर साखर कारखाना येथे येणार असल्याचे कारखाना बचाव कृती समितीचे रामदास घावटे यांनी सांगितले आहे.पारनेर येथील शेतकरी सदस्य, कामगार, ग्रामंस्थाशी संवाद साधणार त्यानंतर 3 वाजता पत्रकारांशी संवादही साधणार आहेत

काय आहे प्रकरण :पारनेर साखर कारखाना विकत घेणारी खाजगी क्रांती शुगर अॅण्ड पावर लिमिटेड या कंपनीकडे कोणतीही मालमत्ता व भांडवल नसताना सुमारे 32 कोटी रूपयांना कारखाना विकत घेतला.

राज्य सहकारी बँकेने पारनेर साखर कारखाना विक्रीची बोगस प्रक्रिया राबवली होती. पारनेर साखर कारखाना विकत घेण्यासाठी वापरलेले 23 कोटी रूपये उद्योगजक अतुल चोरडीया व अशोक चोरडीया यांच्याकडून उसने घेण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. तर उर्वरित 9 कोटी रूपये अक्षर लॅण्ड डेव्हलपर्स यांच्याकडून घेण्यात आले आहेत.

आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासातून ही बाब उघड झालेली आहे. साखर कारखाना विक्री प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याची चोकशी करून दोषींवर कारवाईची मागणी कारखाना बचाव समितीने ईडी कडे केली आहे.

किरीट सोमय्या यांचीही भेट घेतली त्यानुसार पारनेर साखर कारखान्याला ते भेट देऊन माहिती जाणून घेणार असून किरीट सोमय्या ईडीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे कारखाना बचाव समितीचे रामदास घावटे यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!