Sunday, October 24, 2021

नगर ब्रेकींग: 27 वर्षीय युवकास चाकूने भोकसल्याची धक्कादायक घटना

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरातील फकीरवाडा येथील 27 वर्षीय युवकास चाकूने भोकसल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली आहे. आरोपींनी युवकाला कुर्‍हाड, लोखंडी रॉड, लोखंडी पाईप, लाकडी दांडके, बेल्ट आणि धारदार शस्त्राने मारहाण केली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात दहा जणांविरोधात 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात मारहाणीत जखमी झालेले अतुफ अल्लाऊद्दीन शेख (वय 27, रा. फकीरवाडा, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींमध्ये किरण पाटील, अतिश, सनी दंडवते, नितीन जाधव, आदित्य धनवडे (पूर्ण नाव माहित नाहीत) आणि इतर पाच अनोळखी इसमांचा समावेश आहे. सावेडी परिसरातील जुना बोल्हेगाव रोड परिसरात ही घटना घडली.

सविस्तर असे की, सोमवारी (दि. 20) सायंकाळी साडेचारच्या दरम्यान फिर्यादी शेख हे दुचाकीवरून घरी जात होते. यावेळी त्यांच्यासमोर शेळी आल्याने त्यांनी गाडी अचानक थांबवली असता आरोपी किरण पाटील शेख यांच्यासमोर चुकीच्या बाजूने आल्याने दचकला. त्यावेळी शेख आणि आरोपी पाटील यांच्या शाब्दिक वाद झाले.

शेख यांना शिवीगाळ करत धमकी दिली होती. त्यानंतर शेख ऑफिसमध्ये विसरलेला मोबाईल आणण्यासाठी गेले असता आरोपींनी शेख यांना ऑफिसमध्ये येऊन जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकूसह कुर्‍हाड आणि धारदार हत्यारांनी मारहाण केली. तसेच शेख यांच्या कार्यालयातील लॅपटॉप आणि कॅम्प्युटरची तोडफोड करीत नुकसान करून जीवे मारण्याची धमकी दिली.

शेख यांच्या फिर्यादीवरून दहा जणांविरोधात भादंवि. कलम 307, 324, 143, 144, 147, 148, 149, 323, 504, 506, 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास भान्सी करत आहेत.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!