Monday, October 25, 2021

शेतकऱ्यांनो दोन दिवस पावसाचेच, काढलेल्या पिकांची सुरक्षतता महत्वाची

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वावरात असलेल्या पिकांचे नुकसान तर झालेच आहे पण काढणी झालेल्या पिकांची काळजीही महत्वाची आहे.कारण काढणी केलेल्या धान्याला बुरशी लागण्याचा धोका असतो. त्यामुळे खरिपातील सोयाबीन, उडीद याची काढणी केली की ते सुखावून ठेवणे गरजेचे आहे.

सध्या पावसाचे दिवस असले तरी या दरम्यान पिकांची काळजी घेतली तरच उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.खरीपातील पिकांचे यापुर्वीच पाऊस आणि कीडीच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. शिवाय अजून दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागानेही वर्तवलेला आहे. सध्या खरीपातील केवळ उडीद आणि सोयाबीन ही दोनच पिके वावरात आहेत.

सोयाबीनचीही काढणी कामे सुरु असली तरी उशीराने पेरा झालेले सोयाबीन हे वावरात किंवा शेतकऱ्यांनी काढलेल्या सोयाबीनची साठवणूक केलेली आहे.काढलेले सोयाबीन एकत्रच साठवून न ठेवता उन्हामध्ये किंवा कोरड्या वातावरणात सुखावणे गरजेचे आहे. आजही शेतकरी हे पावसाचा परिणाम होऊ नये म्हणून एकाच जागी साठवणूक करुन ठेवतात.

यामुळे शेंगाला बुरशी लागण्याचा धोका संभावतो. त्यामुळे सोयाबीन वाळवूण पुन्हा त्याची गंज लावली तरी पिकाचे नुकसान हे टळणार आहे. दरम्यान, पावसाने उघडीप दिल्यास यंत्राच्या सहाय्याने त्वरीत काढणी कामे उरकून घेणे आवश्यक आहे.

पावसाची शक्यता असेल तर शेतकऱ्यांनी काढणी झाली की लागलीच त्याचे खळे करणे आवश्यक आहे. कारण काढणीनंतर जर पाऊस झाला आणि सोयाबीन, उडीद हे भिजले तर मालाचा दर्जाही ढातळतो आणि पिकाची उगवणही होण्याचा धोका संभावतो त्यामुळे पावसाचे वातावरण असेल

 तर शेतकऱ्यांनी काढणी झाली की, लागलीच यंत्राच्या सहाय्याने पिक पदरात पाडून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मोजावे लागले तरी भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी हे गरजेचे आहे.पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान वर्तवला आहे.

त्यानंतर 25 सप्टेंबरला पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा शेवटही पावसानेच होणार असल्याचे चित्र आहे. पावसाने उघडीप देताच शेतकऱ्यांनी शेती कामे उरकून धान्य हे कोरड्या जागेत ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा शेतामध्ये असतानाही पावसामुळे आणि काढणीनंतरही पावसामुळेच पिकाचे नुकसान होईल.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!