माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांमध्ये ताप आणि सर्दी चे रुग्ण वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही रुग्णांची
कोरणा चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये जवळपास 198 कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत आणि इतरही अनेक जणांना कोरोना ची लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाच्या
पार्श्वभूमीवर राज्य शासनाचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे. राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य विभागासह राज्याच्या आरोग्य विभागाला काही विशेष
सूचना देण्यात आलेल्या आहेत. आयसीएमआरच्या सुचने नुसार वीस कॉन्टॅक्ट ट्रेसिंग शोधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.कोरोना च्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन बेडची क्षमता आणि औषध साठा यांची
स्थिती काय ? आहे यांसह रुग्णांच्या संदर्भातील अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. कोविड केअर सेंटर बाबतची स्थिती काय आहे याबाबतही अहवाल सादर करावा लागणार आहे.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने याबाबत तातडीने हा तपशील मागीवला आहे. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे काही महिन्यांपासून सर्दी, ताप आणि खोकल्याचे रुग्ण आढळून आले आहे. त्यामध्ये नव्या विषणूच्या
अनुषंगाने त्यांच्या तपासण्या देखील केल्या जात आहे. त्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आले आहे.राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता मोजकेच कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. जवळपास कोरोना हद्दपार
झाला आहे. त्यामुळे कोरोनाची चौथी लाट तर येणार नाही ना ? कोरोना चौथी लाट आली तर काय करायचे याबाबतची तयारी काय आहे. अशा सर्व बाजूने आरोग्य विभागाचा आढावा घेतला जात आहे.